Maharashtra Politics: शरद पवारांनी भाजपविरोधात कराडमधून थोपटले दंड!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad Pawar's power show in Karad after Ajit Pawar's revolt. BJP criticized Uddhav Thackeray alleging that he brought down the government.
Sharad Pawar's power show in Karad after Ajit Pawar's revolt. BJP criticized Uddhav Thackeray alleging that he brought down the government.
social share
google news

Sharad Pawar todays speech : 2 जुलै रोजी महाराष्ट्राने आणखी एक राजकीय भूकंप बघितला. अजित पवारांनी भाजपसोबत घरोबा करत सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या निर्णयाला आपला पाठिंबा नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आज शरद पवार यांनी कराड येथे प्रीती संगमावर असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. यावेळी त्यांनी भाजपविरोधात एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.

शरद पवार म्हणाले, “यशवंतराव चव्हाण म्हणायचे की सामन्य माणसाचा लोकशाहीचा अधिकार हा जतन केला पाहिजे. देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य माणसाचा हातभार लागला पाहिजे. त्यांनी या राज्यात नवीन पिढी तयार केली. जिल्ह्याजिल्ह्यांत तरुणांची शक्ती उभी केली. त्यामधून महाराष्ट्र प्रगतीच्या रस्त्यावर आणण्याची काळजी घेतली. यशवंतराव चव्हाण आपल्यात नसले, तरी त्यांनी दिलेला विचार तुमच्या माझ्या अंतःकरणात आहे. त्या विचाराने आपण भूमिका घेतली.”

“महाराष्ट्राला हे शोभणारं नाहीये, असं म्हणून भागणार नाही”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार म्हणाले, “महाराष्ट्र आणि देशात काही जात, धर्म, पंथ यांचा आधार घेऊन संघर्ष कसा होईल. मध्यतंरीच्या काळात संभाजीनगर असो, अकोला असो… अशी काही ठिकाणी आहेत, ज्यांची नावं घेता येतील. त्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या एकत्र राहणाऱ्या समाजामध्ये एकप्रकारची वैरभावना वाढवण्याचा प्रयत्न केला आणि जातीय दंगली झाल्या. हे महाराष्ट्राला शोभणारं नाहीये. पण, फक्त असं म्हणून भागणार नाहीये. या ज्या प्रवृत्ती आहेत समाजविघातक, त्या प्रवृत्तीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आज उभं राहण्याची गरज आहे. तेच काम आपण महाराष्ट्रात करत होतो.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> NCP : अजित पवारांच्या बंडाची स्क्रिप्ट लिहिली गेली होती एप्रिलमध्येच?

“एक काळ असा येऊन गेला की, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकार आपण एकत्रित केलं. कर्तृत्वान सहकारी महाराष्ट्राची सेवा करत होते. आज तेच सरकार या ना त्या पद्धतीने उलथवून टाकण्याचं काम काही लोकांनी केलं. हे इथेच नाही, तर देशाच्या अनेक राज्यांमध्ये केले. मध्य प्रदेशसारखं राज्य. कमलनाथ मुख्यमंत्री, गांधी-नेहरूंचा विचार. व्यवस्थित चाललेलं राज्य उलथवलं गेलं. त्या ठिकाणी जातीय, संघीय वृत्तीला प्रोत्साहन देणारं सरकार त्याठिकाणी आणलं”, असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर हल्ला चढवला.

दिल्ली, पंजाबमधील सरकार पाडण्याचे प्रयत्न

“असे अनेक ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. दिल्ली, पंजाबमध्ये सुरू आहे. विरोधकांचं पश्चिम बंगाल, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दक्षिणेमध्ये अनेक राज्यात सरकार आहे. चुकीच्या प्रवृत्ती निर्माण झाल्या. त्याच प्रवृत्तीने चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र, छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र… या राज्यात एकदंर लोकशाहीच्या पद्धतीने काम करणाऱ्या राजकीय पक्षाला एक प्रकारचा धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे”, असा दावा शरद पवारांनी यावेळी केला.

ADVERTISEMENT

वाचा >> Ajit Pawar : भाजपने महाराष्ट्रात केला ‘करेक्ट कार्यक्रम’, एकाच दगडात मारले दोन पक्षी

“महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका या प्रवृत्तीने घेतली. दुर्दैवाने त्याला तुमच्या आमच्यातील काही सहकारी बळी पडले. ठिके. एखादी व्यक्ती बळी पडली असेल, शंभर बळी असतील, तर फुले-शाहू-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एकवेळ उपाशी राहील, पण महाराष्ट्राची सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. ही शक्ती मजबूत करून जी उलथापालथ करणारी शक्ती आहे. वर्ग आहे. त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

“फार अवकाश नाही. वर्ष, सहा महिन्यांमध्ये लोकांच्या समोर जायची संधी येईल आणि त्यावेळी हे राज्याराज्यांतील लोकशाहीच्या मार्गाने आलेल्या शक्तींना धक्का देणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत, त्या पूर्णपणे बाजूला करून पुन्हा महाराष्ट्र प्रगतीच्या आणि सामान्य माणसांच्या हितासाठी, कष्ट करणाऱ्यांच्या राज्य येईल, यासाठी प्रयत्न करू एवढंच सांगतो”, असंही शरद पवार म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT