Shiv Sena MLAs अपात्रता प्रकरण : विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना पाठवली नोटीस
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण : सुप्रीम कोर्टाने वेगात सुनावणी घेण्यास सांगितल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी कार्यवाही सुरू केली आहे. 25 सप्टेंबर रोजी या प्रकरणावर विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये सुनावणी होणार आहे.
ADVERTISEMENT
Disqualification petitions Of Shiv Sena MLAs : महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आलीये. सुप्रीम कोर्टाने वेगाने सुनावणी घेण्यास सांगितल्यानंतर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार आहे. त्याबद्दलची तारीख शिवसेनेच्या संबंधित आमदारांना कळवण्यात आली असून, विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीस हजर राहण्यासंदर्भातील नोटीस बजावली आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सुनावणीचे वेळापत्रक मागितलं असून, सुनावणी वेगाने घेण्यास सांगितलं आहे.
विधानसभा अध्यक्षांची दिल्लीवारी
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला गेले होतो. दिल्लीतून परतल्यानंतर विधिमंडळाकडून आज सुनावणीबद्दल माहिती देण्यात आली आहे. शिवसेनेच्या संबंधित आमदारांना याबद्दल कळवण्यात आले असून, सुनावणीस हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> ‘शरद पवारांचे दोन नेते लवकरच आमच्याकडे येणार’, गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट
विधिमंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 25 सप्टेंबर रोजी दुपारी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार आहे. विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार असून, त्यास हजर राहण्याचे निर्देश दिले गेले आहेत. असं असलं तरी सुनावणीचं वेळापत्रक विधिमंडळाकडून पाठवण्यात आलेलं नाही.
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना नोटीस नाही
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना विधानसभा अध्यक्षांकडून स्वतंत्रपणे नोटीस बजावली जाऊ शकते, असं म्हटलं जात होतं. पण, अशा स्वरुपाची कोणतीही नोटीस पाठवण्यात आलेली नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> सुप्रीम कोर्टानं वापरलेले ‘हे’ दोन शब्द… अन् CM शिंदेंचं भवितव्य
ADVERTISEMENT
उद्याच्या सुनावणीत ठरणार वेळापत्रक?
सोमवारी (25 सप्टेंबर) होणाऱ्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांना मुख्य प्रतोद कोण आणि मूळ शिवसेना पक्षावर हक्क कुणाचा, याचा निर्णय द्यायचा आहे. त्यामुळे या संबंधात आगामी काळात होणाऱ्या सुनावणींची टाईमलाईन जारी केली जाऊ शकते. सुनावणीचे हेच वेळापत्रक विधानसभा अध्यक्ष कार्यालयाकडून सुप्रीम कोर्टात सादर केलं जाण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT