शिवसेना सुनावणी : शिंदेंना पक्षचिन्ह देण्याच्या आयोगाच्या निर्णयावर कोर्टाचे प्रश्न, काय घडतंय?

मुंबई तक

Shivsena Hearing : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. एन. के. कौल यांनी सादिक अली आणि अर्जुन सिंह प्रकरणातील निकालांचा दाखला देत युक्तिवाद पुढे नेला.

ADVERTISEMENT

Shivsena Hearing
Shivsena Hearing
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी

Shivsena Hearing : शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हाच्या वादावर आज (7 ऑक्टोबर 2026) सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीत शिवसेनेच्या पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर युक्तिवाद सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य असल्याचा युक्तिवाद यापूर्वी ज्येष्ठ वकील एन. के. कौल यांनी केला होता.

आजच्या सुनावणीत एन. के. कौल पुन्हा एकदा आपला युक्तिवाद मांडत आहेत. यापूर्वी कौल यांच्या युक्तिवादादरम्यान न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी, “संवैधानिक पाप करणाऱ्यांना पक्षचिन्हाचा अधिकार कसा?” असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे या प्रश्नावर आज एन. के. कौल काय युक्तिवाद करणार, तसेच कोणत्या नव्या मुद्द्याला हात घालणार, याकडे लक्ष लागलं आहे.

 

शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत एन. के. कौल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानुसार झालेल्या शक्तिपरीक्षणाचा उल्लेख केला. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करताना त्यांनी लोकशाही प्रक्रियेत आपोआप अपात्र ठरण्याची कोणतीही तरतूद नसल्याचं सांगितलं. आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय होईपर्यंत सभागृहात शक्तिपरीक्षण होऊ नये, असा युक्तिवाद वारंवार करण्यात आला. मात्र, अशी कोणतीही घटनात्मक तरतूद नसल्याचं कौल यांनी म्हटलं.