One Nation One Election: आता एकाच वेळी होणार सगळ्या निवडणुका?, पण मध्येच सरकार पडलं तर...
One Nation One Election: देशात एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्याबाबत कोविंद समितीचा अहवाल स्वीकारण्यात आला आहे. जाणून घ्या त्याचविषयी सविस्तर.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एक देश-एक निवडणूकला कायदेशीर स्वरूप देण्याची तयारी
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने अहवालाला दिली मंजुरी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केला अहवाल
नवी दिल्ली: 'एक देश-एक निवडणूक'ला कायदेशीर स्वरूप देण्याची तयारी मोदी सरकारने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'वन नेशन-वन इलेक्शन' या समितीच्या अहवालाला मंजुरी देण्यात आली आहे. (so all elections will be held together in 2029 kovind committee report on one nation one election approved know what will happen next)
या संदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने मार्चमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला अहवाल सादर केला होता. या अहवालात लोकसभा तसेच राज्याच्या विधानसभा आणि पंचायत निवडणुका कशा घेता येतील याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
या अहवालाला अशा वेळी मंजुरी देण्यात आली आहे जेव्हा अलीकडेच मोदी सरकार या टर्ममध्ये एक देश, एक निवडणूक यासंदर्भात विधेयक आणण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत होत्या.
हे एक मोठे पाऊल का आहे?
मोदी सरकार अनेक दिवसांपासून एक देश, एक निवडणुकीचा पुरस्कार करत आहे. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राजकीय पक्षांना एक देश, एक निवडणुकीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते.










