Ajit Pawar यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा, शिंदेंची ‘ही’ रिअॅक्शन.. पडद्यामागे काय सुरू?
अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होती अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. याच प्रश्नाबाबत जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते त्यावर काहीही न बोलता थेट निघून गेले.
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा आज (22 जुलै) वाढदिवस असून त्यांचे कार्यकर्ते हे त्यांना मुख्यमंत्री (Chief Minister) पदासाठी शुभेच्छा देत आहेत. एवढंच नव्हे तर त्यासाठी बॅनर देखील लावण्यात येत आहेत. तर दुसरीकडे आजच्याच दिवशी राजधानी दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह पंतप्रधान मोदींची (PM Modi) भेट घेतली. ज्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (strong discussion going on ajit pawar being chief minister soon. when cm eknath shinde asked about this issue he left without saying anything maharashtra news today live marathi)
दरम्यान, याचवेळी त्यांना जेव्हा असा सवाल विचारण्यात आला की, अजित पवार यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया ही फारच सूचक अशा स्वरुपाची होती. त्यामुळे पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पाहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधानांच्या भेटीनंतर काय म्हणाले:
‘आम्ही संपूर्ण कुटुंबाने पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. माझे वडील देखील सोबत होते आणि संपूर्ण कुटुंब हे सोबत होते. बराच वेळ पंतप्रधान मोदींनी या सदिच्छा भेटीसाठी दिला. त्यांचे मी आभार मानतो. या दरम्यान राज्यात जे प्रकल्र सुरू आहेत त्याविषयी देखील चर्चा झाली, तसेच पावसाविषयी देखील चर्चा झाली. इर्शाळगडाच्या दुर्घटनेविषयी देखील त्यांनी माहिती जाणून घेतली. अनेक मुद्यांवर चर्चा झाली.’
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
‘धारावीच्या प्रकल्पाविषयी पंतप्रधान मोदींनी विचारलं..’
‘धारावीचा जो प्रकल्प आहे तो देखील पंतप्रधान महोदयांनी आवर्जून आठवण काढली. कारण हा जो प्रकल्प आहे तो आशिया खंडातील मोठा प्रकल्प आहे. तिथला प्रकल्प पूर्ण झाल्यावर लोकांचं जीवनमान उंचावेल.. म्हणून तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे अशा प्रकारची आशा मोदींनी व्यक्त केली.’
ADVERTISEMENT
‘इर्शाळवाडीसारख्या प्रकरणामध्ये सत्ताधारी किंवा विरोधक अशी भूमिका न घेता लोकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि कायमस्वरुपी त्यावर तोडगा काढला पाहिजे. कालच आम्ही मंत्रिमंडळात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सिडकोला देखील तशा प्रकारचे आदेश दिले आहेत.’
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Ajit Pawar यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा, शिंदेंची ‘ही’ रिअॅक्शन.. पडद्यामागे काय सुरू?
‘वडिलांना खूप आनंद झाला, पंतप्रधान माझ्या नातवासोबतही खेळले’
‘माझ्या वडिलांना समाधान होतं.. आनंद होता चेहऱ्यावर आणि पंतप्रधान महोदयांना भेटायची सगळ्यांना इच्छा असते. ती भेट झाली त्याचा विशेष आनंद माझ्या वडिलांना होता.’
‘माझ्या नातवासोबत खूप गप्पा मारल्या.. खेळले.. फार समाधान आहे. चारही आमच्या पिढ्या त्यांना एकत्र भेटले. आईची कमतरता भासली.. शेवटी आई हा जिव्हाळ्याचा विषय आहे. दुर्दैवाने ती नाहीए. पण तिचा आशीर्वाद पाठिशी आहे.’
अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची जोरदार चर्चा, सीएम शिंदे काय म्हणाले?
‘आज फक्त सदिच्छा भेट होती. राजकारणावर आज कोणतीही चर्चा झाली नाही.’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मात्र, याचवेळी जेव्हा त्यांना असं प्रश्न विचारण्यात आला की, सध्या अजित पवार यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. तेव्हा मुख्यमंत्री शिंदे हे त्यावर काहीही न बोलता तिथून निघून गेले.
हे ही वाचा >> Manipur: ‘..तर ‘त्या’ विषयावर पंतप्रधान मोदींनी तोंड उघडलं नसतं’, ठाकरेंची सडकून टीका
दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये राजधानी दिल्लीतून राज्यातील राजकारणात वेगवेगळ्या प्रकारे धक्कातंत्राचा वापर करुन अनपेक्षित असे धक्के दिले जात आहे. अशातच पुन्हा एकदा तसाच धक्का देण्याचा दिल्लीतील नेतृत्वाची तयारी असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ADVERTISEMENT