Maharashtra Assembly Election Survey : ठाकरेंना बसणार जबर झटका, विधानसभेत शिंदेंचं काय होणार? खळबळजनक सर्व्हे
Maharashtra Assembly Election Opinion Poll : राज्याचे विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने उरले आहेत. तत्पुर्वी अनेक ओपनियन पोल समोर आले आहेत. हे ओपनियल पोल राजकीय नेत्यांची झोप उडवणारे आहेत. त्यामुळे नुकत्याच हाती आलेल्या ओपनियन पोलनुसार विधानसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? महाराष्ट्रात कोण मोठा भाऊ ठरणार? आणि कोणत्या पक्षाला धक्का बसणार आहे? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विधानसभेत ठाकरे किती जागा जिंकणार?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेना किता जागांवर विजय मिळवणार?
महाराष्ट्रात कोणता पक्ष मोठा भाऊ ठरणार?
Times Now Navbharat-Matrize Opinion Poll Maharashtra: राज्याचे विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Assembly Election) अवघे दोन महिने उरले आहेत. तत्पुर्वी अनेक ओपनियन पोल समोर आले आहेत. हे ओपनियल पोल राजकीय नेत्यांची झोप उडवणारे आहेत. त्यामुळे नुकत्याच हाती आलेल्या ओपिनियन पोलनुसार (Opinion Poll) विधानसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? महाराष्ट्रात (Maharashtra) कोण मोठा भाऊ ठरणार? आणि कोणत्या पक्षाला धक्का बसणार आहे? हे जाणून घेऊयात. (times now navbharat matrize opinion poll for maharashtra assembly election 2024 eknath shinde vs udhhav thackeray maha vikas agahdi vs mahayuti maharashtra politics)
टाईम्स नाऊ आणि मॅट्रिझनं एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा फटका बसणार आहे. कारण ठाकरे विधानसभेत 26-31 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. ठाकरेंच्या शिवसेना युबीटीला 14.2 टक्के वोट शेअर मिळण्याचा अंदाज आहे. जर सर्व्हेनुसार ठाकरेंच्या तुलनेत शिंदेंच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स पाहिला तर विधानसभेत त्यांना 42-52 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शिंदेंना 6.8 टक्के वोट शेअर मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व्हेंनुसार ठाकरेंच्या तुलनेत शिंदे वरचढ ठरताना दिसत आहे.
हे ही वाचा : Maharashtra Assembly Election Survey : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार? मविआची झोप उडवणारा सर्व्हे
महाराष्ट्रात हा पक्ष मोठा भाऊ ठरणार?
टाईम्स नाऊ आणि मॅट्रिझच्या अंदाजानुसार राज्यात भाजप 26.2 टक्के वोट शेअरसह 83 ते 93 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या ओपनियन पोलनुसार विधानसभेत भाजप महाराष्ट्रात मोठा भाऊ ठरताना दिसतोय. लोकसभेत काँग्रेस महाराष्ट्रात मोठा भाऊ ठरला होता. आता विधासभेत हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. भाजपचा घटकपक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना 6.8 टक्के वोट शेअरसह 42-52 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी 2.8 टक्के वोट शेअरसह 07-12 जागा जिंकण्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
टाईम्स नाऊ आणि मॅट्रिझच्या अंदाजानुसार लोकसभेत महाराष्ट्रात मोठा भाऊ ठरलेला काँग्रेस विधानसभेत ठाकरे आणि पवारांपेक्षा जास्त जागा जिंकताना दिसतोय. काँग्रेस 16.2 टक्के वोट शेअरसह 58-68 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तर ठाकरेंची शिवसेना 14.2 टक्के वोट शेअरसह 26-31 जिंकण्याची शक्यता आहे. आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 10.1 टक्के वोट शेअरसह 03-08 जागा जिंकण्याचा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
पक्ष | वोट शेअर | जागा |
भाजप | 26.2 टक्के | 83-93 |
शिवसेना (एकनाथ शिंदे) | 6.8 टक्के | 42-52 |
राष्ट्रवादी (अजित पवार) | 2.8 टक्के | 07-12 |
काँग्रेस | 16.2 टक्के | 58-68 |
शिवसेना (UBT) | 14.2 टक्के | 26-31 |
राष्ट्रवादी (शरद पवार) | 13.7 टक्के | 35-45 |
इतर | 10.1 टक्के | 03-08 |
अशाप्रकारे राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. बहुमतासाठी 145 चा आकडा गरजेचा आहे. त्यामुळे ओपिनियन पोलमधील अंदाजानुसार विधानसभेत महायुतीला 137-152 अशा जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 129-144 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती राज्यात सरकार स्थापण करण्याचा अंदाज या पोलमधून व्यक्त होतोय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Crime : कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड! पती, गर्भवती पत्नीसह 8 वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं, नेमकं कारण काय?
ADVERTISEMENT