Maharashtra Assembly Election Survey : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार? मविआची झोप उडवणारा सर्व्हे
Maharashtra Assembly Election Opinion Poll : महाराष्ट्रात अवघ्या दोन-तीन महिन्यात विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी राज्यात सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. असे असतानाच आता एक ओपनियन पोल समोर आला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला किती जागा येणार?
महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार?
महाराष्ट्रात मोठा भाऊ कोण ठरणार?
Times Now Navbharat-Matrize Opinion Poll Maharashtra: महाराष्ट्रात अवघ्या दोन-तीन महिन्यात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) लागण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी राज्यात सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) अशी थेट लढत होणार आहे. असे असतानाच आता एक ओपनियन पोल समोर आला आहे. या पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. (times now navbharat matrize opinion poli for maharashtra assembly election 2024 maha vikas agahdi vs mahayuti maharashtra politics)
टाईम्स नाऊ आणि मॅट्रिझनं एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत तगडी फाईट होण्याची शक्यता आहे. विधानसभेत महायुतीला 137-152 अशा जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 129-144 जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. बहुमतासाठी 145 चा आकडा गरजेचा आहे. त्यामुळे ओपिनियन पोलमधील अंदाजानुसार महायुती सहजरीत्या महाराष्ट्रात पुन्हा सरकार बनवता दिसतेय.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : '...तर योजनेचे 1500 हातातून गमावून बसाल', 'ही' चूक अजिबात करू नका
288 जागांपैकी कुणाला किती मिळणार?
महायुती : 137-152
महाविकास आघआडी : 129-144
इतर : 03-08
दरम्यान हा झाला यूती आणि आघाड्यांना मिळालेल्या एकूण जागांचा आकडा. आता ओपनियन पोलनुसार कोणत्या पक्षाला किती वोट शेअर मिळालं आहे? आणि किती जागा जिंकता आल्या आहेत? हे पाहूयात.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
टाईम्स नाऊ आणि मॅट्रिझच्या अंदाजानुसार राज्यात भाजप 26.2 टक्के वोट शेअरसह 83 ते 93 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या ओपनियन पोलनुसार विधानसभेत भाजप महाराष्ट्रात मोठा भाऊ ठरताना दिसतोय. लोकसभेत काँग्रेस महाराष्ट्रात मोठा भाऊ ठरला होता. आता विधासभेत हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. भाजपचा घटकपक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना 6.8 टक्के वोट शेअरसह 42-52 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी 2.8 टक्के वोट शेअरसह 07-12 जागा जिंकण्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा : Sanjay Raut: "लालबागचा राजा गुजरातला नेण्याचा...", अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावरून राऊत कडाडले
टाईम्स नाऊ आणि मॅट्रिझच्या अंदाजानुसार लोकसभेत महाराष्ट्रात मोठा भाऊ ठरलेला काँग्रेस विधानसभेत ठाकरे आणि पवारांपेक्षा जास्त जागा जिंकताना दिसतोय. काँग्रेस 16.2 टक्के वोट शेअरसह 58-68 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तर ठाकरेंची शिवसेना 14.2 टक्के वोट शेअरसह 26-31 जिंकण्याची शक्यता आहे. आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 10.1 टक्के वोट शेअरसह 03-08 जागा जिंकण्याचा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
पक्ष | वोट शेअर | जागा |
भाजप | 26.2 टक्के | 83-93 |
शिवसेना (एकनाथ शिंदे) | 6.8 टक्के | 42-52 |
राष्ट्रवादी (अजित पवार) | 2.8 टक्के | 07-12 |
काँग्रेस | 16.2 टक्के | 58-68 |
शिवसेना (UBT) | 14.2 टक्के | 26-31 |
राष्ट्रवादी (शरद पवार) | 13.7टक्के | 35-45 |
इतर | 10.1 टक्के | 03-08 |
अशाप्रकारे राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. बहुमतासाठी 145 चा आकडा गरजेचा आहे. त्यामुळे ओपिनियन पोलमधील अंदाजानुसार विधानसभेत महायुतीला 137-152 अशा जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 129-144 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती राज्यात सरकार स्थापण करण्याचा अंदाज या पोलमधून व्यक्त होतोय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT