PM Modi Marathi Speech: ‘आज संकष्टीचा दिवस…’, पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण
PM Modi Samruddhi Express way Nagpur: नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज (11 डिसेंबर) नागपूर (Nagpur) दौऱ्यावर आहेत. समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Express Way) नागपूर-शिर्डी (Nagpur-Shirdi)या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं. यासोबतच मेट्रो, नागपूर रेल्वे स्टेशन, वंदे भारत एक्सप्रेस, एम्स रुग्णालय यासारख्या विविध प्रकल्पाचे देखील पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलं. याच […]
ADVERTISEMENT
PM Modi Samruddhi Express way Nagpur: नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज (11 डिसेंबर) नागपूर (Nagpur) दौऱ्यावर आहेत. समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Express Way) नागपूर-शिर्डी (Nagpur-Shirdi)या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं. यासोबतच मेट्रो, नागपूर रेल्वे स्टेशन, वंदे भारत एक्सप्रेस, एम्स रुग्णालय यासारख्या विविध प्रकल्पाचे देखील पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलं. याच प्रसंगी भाषण करताना मोदींनी उपस्थितांशी थेट मराठीतून (Marathi) संवाद साधला. (today is the day of sankashti chaturthi pm modis speech in marathi samruddhi express way nagpur)
ADVERTISEMENT
पाहा पंतप्रधान नेमकं काय म्हणाले:
‘आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभकाम करताना आपण प्रथम गणेशपूजन करतो. आज नागपुरात आहोत तर टेकडीच्या गणपती बाप्पाला माझे वंदन. 11 डिसेंबरचा आजचा दिवस संकष्टी चतुर्थीचा पवित्र दिवस आहे.’ असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
डबल इंजिन सरकार
‘आता आपल्याला डबल इंजिनचं सरकार हे किती वेगवान आहे आणि किती महत्त्वाचं आहे आपल्याला समृद्धी महामार्ग प्रकल्पावरुन समजलं असेलच.’ असं म्हणत पंतप्रधान मोदींनी राज्यात जे सरकार आलंय त्याचं महत्त्व अधोरेखित करुन देण्याचा प्रयत्न केलं.
हे वाचलं का?
PM Modi Nagpur Visit : नागपुरकरांना मोठी भेट, मोदी करणार समृद्धी महामार्गाचं लोकार्पण
400 कोटींचं धरण, 18 हजार कोटींचं झालं!
‘आता मी आपल्याला एक उदाहरण देतो की, प्रकल्प रखडल्याने त्याचे किती गंभीर परिणाम होतात. मी तुम्हाला महाराष्ट्रातील गोसीखुर्द धरणाचं उदाहरण देतो.’
ADVERTISEMENT
‘साधारण 30 वर्षांपूर्वी गोसीखुर्द धरणाच्या प्रकल्पाला सुरुवात झाली. तेव्हा या प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च हा 400 कोटी खर्च होता. पण
ADVERTISEMENT
अनेक वर्ष संवेदनाहीन कार्यशैलीमुळे हे धरण पूर्णच झालं नाही. आता या धरणाचा खर्च 18 हजार कोटी एवढा झाला आहे. त्यामुळे विचार करा की केवढा आर्थिक बोजा आपल्याला सहन करावा लागला आहे.’
‘पण 2017 साली महाराष्ट्रात डबल इंजिन सरकारमुळे धरणाचं काम वेगवान झालं. यंदाच्या वर्षी हे धरण पूर्णपणे भरलं आहे. पण तुम्ही विचार करा की, एक धरण तयार होण्यासाठी तब्बल तीन दशकांपेक्षा जास्त वेळ लागला. ज्यानंतर त्याचा फायदा हा येथील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना झाला आहे.’ असं म्हणत पंतप्रधान मोदींनी राज्यात अनेक वर्ष सत्तेत असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Exclusive: समृद्धी महामार्गाला उद्धव ठाकरेंचाच विरोध होता?
दरम्यान, आपल्या या भाषणात पंतप्रधान मोदींनी प्रत्येक राज्याला डबल इंजिन सरकार कसं आवश्यक आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा कशा झटपट उभ्या राहू शकतील या सगळ्याबाबत भाष्य केलं. त्यासोबतच राजकीय विरोधकांवर देखील निशाणा साधला.
यामुळे आता विरोधक पंतप्रधान मोदींच्या या टीकेचं नेमकं कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT