Suresh Navale : "भाजप शिवसेनेला संपवत आहे", शिंदेंचा नेता संतापला, खळबळजनक विधानं

मुंबई तक

ADVERTISEMENT

भाजप शिवसेना संपवत असल्याचा सुरेश नवले यांचा आरोप.
सुरेश नवले यांची भाजपवर टीका.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेना नेते सुरेश नवले यांचे भाजपवर गंभीर आरोप

point

भाजपचा एकनाथ शिंदेंवर दबाव असल्याचा दावा

point

सुरेश नवले भाजपबद्दल काय काय बोलले?

Shiv Sena Leader Suresh Navale : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते सुरेश नवले यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना नवले म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांना (एकनाथ शिंदे) चक्रव्युहात अडकवले असून, त्यांचा अभिमन्यू झाला आहे. भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत", असा संताप नवले यांनी व्यक्त केला. 

ADVERTISEMENT

नवले म्हणाले की, "भाजपने कृपाल तुमाने, हेमंत पाटील, भावना गवळी यांचा बळी दिला आहे. भाजपच्या भट्टीमध्ये शिवसैनिकांचे बळी जात आहे; महाराष्ट्रातील शिवसेनेसाठी हे शोभादायक नाही."

"शिवसैनिकाला न्याय मिळत नाही म्हणून हा उठाव झाला. सगळे मुख्यमंत्र्यांच्या सोबत बाहेर पडले आणि सरकार अस्तित्वात आले. ज्या कारणासाठी उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनी सोडलं, ठाकरेंचं नेतृत्व झुगारलं; त्याच कारणासाठी शिवसैनिकांचा राग आहे", असा संताप सुरेश नवले यांनी व्यक्त केला. 

हे वाचलं का?

पुढे म्हणाले, "सामान्य शिवसैनिक सोडा, विद्यमान खासदारांना आपली खासदारकी मिळवता आली नाही, हे दुर्दैव आहे. मित्रपक्षाचे उमेदवार सांभाळण्यासाठी पोसण्यासाठी शिवसेनेवर जबाबदारी असं चित्र दिसत आहे."

सुरेश नवलेंनी व्यक्त केली खदखद

"परभणीची जागा रासपला दिली. नाशिकची जागा शिवसेनेची आहे. मला खात्री आहे की, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडली आहे. रत्नागिरीची जागा भाजपला सोडली आहे. भारतीय जनता पक्ष लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी ड्रामा करत आहे", अशा शब्दात नवले यांनी खदखद मांडली.

ADVERTISEMENT

पुढे ते म्हणाले, "राज्यामध्ये शिवसेनेचा बळी देणं आणि शिवसेना संपवण्याचे कारस्थान भारतीय जनता पार्टी करत आहे. भाजप शिवसेना पक्ष संवत आहे. आयबीचा रिपोर्ट, सर्व्हे निगेटिव्ह आहे म्हणत उमेदवारी नाकारत आहेत. भाजपच्या दबावाला मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) बळी पडले आहेत. मुख्यमंत्री भाजपच्या दबावाला एकाकी तोंड देत आहेत. ते कमी पडत आहेत. सामूहिक दबाव आणून जागा सोडून घेतल्या जात आहेत", असे आरोप नवले यांनी केले आहेत. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT