Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी घोषणा, विधानसभा स्वबळावर लढणार.. भाजपसोबत युती नाही!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे आता त्यांची भाजपसोबत युती नसेल हे स्पष्ट झालं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राज ठाकरेंची मोठी घोषणा
मनसे विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार
मनसेची भाजपसोबत युती नाही!
Raj Thackeray: मुंबई: लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत आज (25 जुलै) एक मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभेत मनसे स्वबळावर लढणार असून ते जवळजवळ 250 जागांवर आपले उमेदवार देणार आहेत. याचाच अर्थ विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची भाजपसोबत युती नसेल हे स्पष्ट झालं आहे. (mns chief raj thackeray big announcement vidhan sabha election will fight on its own and give candidates on 250 seats no alliance with bjp)
ADVERTISEMENT
राज ठाकरे यांनी आज (25 जुलै) मुंबईतील रंगशारदा येथे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. ज्यामध्ये त्यांनी आगामी विधानसभेच्या दृष्टीने नेमकं काय केलं जाईल याबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. पाहा यावेळी राज ठाकरे नेमकं काय म्हणाले.
राज ठाकरेंची मोठी घोषणा, भाजपसोबत युती का नाही?
'कोण आमदार कुठे गेलाय.. कोण कोणत्या पक्षात गेलाय काही समजत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या सर्व राजकीय पक्षांमध्ये जे काही घमासान होणार आहे ना.. ते न भूतो.. असं असेल.'
हे वाचलं का?
'मला कोणी तरी सांगितलं की, आपल्या पक्षातले 1-2 पदाधिकारी हे दुसऱ्या पक्षात जाणार आहेत. तयारीत आहेत. मी येऊन स्वत: लाल कार्पेट घालतो.. जा म्हणून.. त्यांचंच स्थिर नाही.. तुम्हाला कुठून डोक्यावर घेतील?'
हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल, वाचा काय आहेत नव्या अटी शर्ती?
'गेल्या लोकसभेला काय झालं पाहिलं ना.. वर्षापर्यंत घुसले.. या विधानसभेच्या वेळेला कुठे-कुठे घुसतील ते माहीत नाही. आजच्या बैठकीला बोलावण्याचं कारण म्हणजे पक्षामधील चार-चार जणांची टीम केली.'
ADVERTISEMENT
'जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांना माहीत नसेल. पण या टीम तुमच्या जिल्हा, तालुकांमध्ये येऊन गेले. तिथे त्यांचा सर्व्हे झाला. पहिला सर्व्हे आला आपल्याकडे. या टीम पुन्हा येतील तुमच्या तालुक्यात.. तेव्हा काय मूळ परिस्थिती आहे ते सांगा. काय गोष्टी होऊ शकतात याचा नीट विचार करा.'
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Mumbai-Pune Weather Update: मुंबई-पुण्यात पावसाचा कहर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट
'मी तुम्हाला खरं सांगतो निवडून येण्याची क्षमता असलेले, तयारी असलेले अशा लोकांनाच तिकीटं दिली जातील. कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मला मनसेचे आपली लोकं सत्तेत काही करून बसवायची आहेत, काहीही करुन.. अनेक लोकं हसतील या गोष्टीला.. हसू देत.. पण ही गोष्ट घडणार म्हणजे घडणार.'
'युती होईल का? आपल्याला कोणत्या जागा मिळतील? असा कोणताही विचार मनात आणू नका.. जवळपास 225 ते 250 जागा आपण लढवणार आहोत.' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
राज ठाकरे यांच्या या विधानाने हे स्पष्ट झालं आहे की, विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष स्वबळावर लढणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT