Devendra Fadnavis: 'अनिल देशमुखांच्या अनेक VIDEO क्लिप्स माझ्याकडे', फडणवीसांचा गौप्यस्फोट

योगेश पांडे

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांनी थेट दिला इशारा?
'या' 5 नेत्यांपैकी एक जण होऊ शकतो उपमुख्यमंत्री?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीसांनी थेट दिला इशारा

point

अनिल देशमुखांचे व्हिडिओ असल्याचा दावा

point

श्याम मानवांनी भाजपवर केला खळबळजनक आरोप

Shyam Manav: मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजप नेत्यांनी पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रावर सही न केल्यानेच त्यांना अटक झाली. असा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी केल्याने एकच खळबळ उडाली. ज्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना एक मोठं विधान केलं आहे. (i have some audio visuals of anil deshmukh i have to make all those things public direct warning from devendra fadnavis)

ADVERTISEMENT

'मी कोणाच्या नादी लागत नाही, पण कोणी नादी लागलं तर सोडत नाही', पाहा फडणवीस नेमकं काय-काय म्हणाले..

'आता सीबीआयने जी चार्जशीट दाखल केली आहे त्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की, कशाप्रकारे गिरीश महाजनांवर मोक्का लागला पाहिजे, गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागल्या पाहिजे याकरिता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी त्या ठिकाणी दबाव टाकला.' 

'हे गुन्हे दाखल करायला लावले. या संदर्भातील ऑडिओ-व्हिझ्युअल पुरावे मी स्वत: सीबीआयकडे दिले होते. ज्यामुळे केस झाली. त्या केसमध्ये सीबीआयने पुराव्यासहीत चार्जशीट दाखल केलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये कशा प्रकारे विरोधी पक्षाच्या आमदारांना मोक्का लावणे, खोट्या केसेस लावणे याची मोडस ऑपरेंडी होती हे आपण सगळ्यांनी नीट पाहिलं आहे.'

हे वाचलं का?

'पहिली गोष्ट म्हणजे इतकी वर्ष श्याम मानव मला ओळखतात. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशाप्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं होतं. पण दुर्दैवाने असं वाटतं की, इको सिस्टिममध्ये अलिकडच्या काळात सुपारीबाज लोकं घुसले आहेत. दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का? असा प्रश्न मला पडतो.' 

हे ही वाचा>> Amit Shah : ''शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार मग अजितदादा कोण?'', शिंदेंचा नेता 'हे' काय बोलून गेला?

'पण एक गोष्ट मला सांगायची आहे की, या ठिकाणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागले तेव्हा आमचं सरकार नव्हतं. महाविकास आघाडीचं सरकार होतं. ती केस मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर लागली आणि त्यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर करायला लावला.' 

ADVERTISEMENT

'त्यांच्याच सरकारमध्ये तो एफआयआर झाला आणि त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि आता ते बेलवर बाहेर आहेत. ते काही सुटलेले नाहीत. 100 कोटीच्या वसूलीच्या केसमध्ये ते फक्त बेलवर बाहेर आले आहेत.' 

ADVERTISEMENT

'मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो.. मी आजपर्यंत बोललो नव्हतो. ते सातत्याने आरोप करतात तरी मी शांत आहे. कारण मी अशाप्रकारचं राजकारण करत नाही, कोणावर डूख ठेवून राहत नाही. पण माझा एका सिद्धांत पक्का आहे. मी कोणाच्या नादी लागत नाही, पण कोणी नादी लागलं तर सोडत नाही.' 

'मला त्यांनाही (अनिल देशमुख) सांगणं आहे की, त्यांच्याच पक्षातील लोकांनी त्या काळातील त्यांचे काही ऑडिओ-व्हिझ्युअल मला आणून दिलेले आहेत. त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंना काय बोलतायेत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायेत.. जे आरोप ते आता आमच्यावर जे बोलतायेत ते तेव्हा काय बोलत होते, वाझेवर ते काय बोलतायेत.. या सगळ्या गोष्टी त्यात आहेत. माझ्यावर वेळ आली तर त्या मला सार्वजनिक कराव्या लागतील.' 

हे ही वाचा>> Sharad Pawar: बंद खोलीत पवार- CM शिंदेंची भेट, कशाबद्दल झाली चर्चा? Inside Story

'मी अशाप्रकारचं राजकारण करत नाही. पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल. तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं की, देवेंद्र फडणवीस कधीही पुराव्याशिवाय बोलत नाही.' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनेक वर्ष काम करणारे श्याम मानव यांनी अनिल देशमुख यांना भाजपने अडकविण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 

श्याम मानव यांचा नेमका दावा काय?

अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांच्या घरी एकूण 4 प्रतिज्ञापत्र पाठविण्यात आली होती. त्यावर सह्या करा आणि ईडी कारवाईपासून वाचा, असा निरोप अनिल देशमुख यांना देण्यात आला होता.  त्यावेळी सत्तेत नसलेल्या भाजपच्या नेत्यांनी ही ऑफर दिली होती. 

पहिल्या प्रतिज्ञापत्रात असं नमूद करण्यात आलं होतं की, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना मातोश्रीवर बोलावून 100 कोटी गोळा करण्याचे आदेश दिले होते. तर दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरेंनी दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा अत्यंत गंभीर आरोप करण्यात आला होता.

तिसऱ्या प्रतिज्ञापत्रात अनिल परबांचे गैरव्यवहार आणि बांधकामं याबाबत काही गोष्टी होत्या. तर चौथ्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांनी गुटखा विक्रेत्यांकडून कोट्यवधी रुपये गोळा करण्याचे आदेश दिले होते. असं म्हणत श्याम मानव यांनी भाजपवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते.  

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT