Manoj Jarange: 'भाजप कधीच सत्तेत येऊ देऊ नका', जरांगेंचा मराठा समाजाला उघडउघड मेसेज!

मुंबई तक

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस
मनोज जरांगे पाटील यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप.
social share
google news

Manoj Jarange vs BJP: अंतरवाली सराटी: मराठा आरक्षणासाठी आग्रही मागणी करणारे मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण आज (24 जुलै) मागे घेतलं. यावेळी त्यांनी आरक्षणासाठी राजकीय लढाई देण्याची सुरुवात करणार असल्याचं सांगितलं. उपोषण मागे घेताना जरांगेंनी राज्यातील सरकारवर तुफान टीका केली. एवढंच नव्हे तर त्यांनी भाजपचे उमेदवार पाडू असंही यावेळी म्हटलं. आतापर्यंत जरांगेंनी कोणाला पाडण्याबाबत उघड भूमिका घेतली नव्हती. पण आता त्यांनी पहिल्यांदाच भाजपविरोधात आपली आघाडी उघडली आहे. (criticized to devendra fadnavis never let bjp come to power manoj jarange open appeal to the maratha community )

ADVERTISEMENT

'देवेंद्र फडणवीस यांचा मला तुरुंगात टाकण्याचा कट आहे. जर मला त्यांनी तुरुंगात टाकलं तर भाजप सत्तेत येऊ देऊ नका, भाजपची एकही सीट आली नाही पाहिजे.' असं म्हणत मनोज जरांगे यांनी आता विधानसभा निवडणुकीत थेट भाजपला पाडा असं आवाहन मराठा समाजाला केलं. 

'फक्त एकच सांगतो कधीच भाजप सत्तेत येऊ देऊ नका', जरांगे नेमकं काय म्हणाले?

'हा देवेंद्र फडणवीसने रचलेला डाव आहे. विधी आणि न्याय विभाग त्याच्याकडे आहे. त्याच्या अंतर्गत सगळं येतं तो न्यायाधीशांना फिरकी घ्यायला लावू शकतो, न्यायाधीश त्याचा पाहुणा आहे अशी ऐकीव माहिती आहे. कोर्टाचं खातं त्याच्याकडे आहे. दुसरं.. गृहविभाग त्याच्याकडे आहे म्हणून त्याचं सगळं ऐकतात. तो जाणूनबुजून मला याच्यात गुंतवणार आहे.' 

हे वाचलं का?

'आता त्याचा डाव सांगतो मी तुम्हाला.. तो मला यात आत टाकणार आहे. आत जे कैदी आहेत त्यांच्याकडून मला आत सुद्धा मारायचं अशी माहिती मला काल रात्रीच मिळाली आहे.' 

'फक्त एकच सांगतो कधीच भाजप सत्तेत येऊ देऊ नका. मराठा समाजाला एवढंच सांगतो.' 

'पोलीस त्याच्या हातात आहे. कोर्ट, मंत्रालय त्याच्या हातात आहे. तो मला गुंतवणार.. कारण त्याला निवडणुका निभावून न्यायच्या आहेत मला आत टाकून. मी काय आत जात नाही.' 

ADVERTISEMENT

'मी आत गेलो की, भाजपची एकही सीट आली नाही पाहिजे. जिथे आपला समाज नसेल तिथे सुद्धा.. एक पण सीट आली नाही पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे. कायमच.. एक राहिला नाही पाहिजे..' असं म्हणत जरांगेंनी उघडपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला.  

प्रविण दरेकरांचं जरांगेंना प्रत्युत्तर

मनोज जरांगे यांनी भाजपवर टीका केल्यानंतर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत जरांगेंना प्रत्युत्तर दिलं. 

ADVERTISEMENT

'यामागे कोण आहे... महाराष्ट्रातील वरिष्ठ, जबाबदार नेते.. हे त्या ठिकाणी आता काही लपून राहिलेलं नाही. आंदोलनाला फूस देतं कोण.. जरांगेची भाषा ज्या पद्धतीने चालली आहे त्यामुळे विरोध कोणत्या दिशेला आणि समर्थन कोणत्या दिशेला आहे हे स्पष्टपणे त्याठिकाणी दिसतंय. जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणाचा नेम कोण चालवतंय हे आता उघड झालंय.' असं म्हणत प्रविण दरेकर यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.  
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT