Ajit Pawar : "...म्हणून मी गुलाबी जॅकेट घालायला लागलो", अजित पवारांनी सांगितलं कारण
Ajit Pawar : अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीची जोरात तयारी सुरू केली आहे. बारामतीपासून मेळावे घेण्यास सुरूवात केली असून, वेगळ्या लूकमध्ये ते दिसत आहेत. त्यांच्या बदलेल्या पेहरावाबद्दलच एका महिलेने प्रश्न केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अजित पवार हल्ली गुलाबी जॅकेटमध्ये दिसू लागले आहेत

गुलाबी जॅकेटबद्दल एका महिलेने अजित पवारांना प्रश्न विचारला

अजित पवारांनी गुलाबी जॅकेट घालण्याचे कारण सांगितले
Ajit Pawar News : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची अजित पवारांनी तयारी सुरू केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारांपर्यंत जाण्यासाठी मेळावे सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून अजित पवारांनी संवाद मेळावे घेत आहे. या कार्यक्रमांमध्ये अजित पवार वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. त्यांच्या या बदललेल्या लूकबद्दल एका महिलेने प्रश्न केला. त्याला अजित पवारांनी दिलेले उत्तर ऐकून सगळेच हसले. (why Ajit pawar wearing pink jacket nowadays)
अजित पवारांनी महाराष्ट्रात दौरे करायला सुरूवात केली आहे. वेगवेगळे कार्यक्रम पक्षाच्या वतीने आयोजित केले जात असून, या माध्यमातून सरकारच्या योजना पोहोचवण्याचे कामही केले जात आहे. विशेषतः महिला मतदारांवर लक्ष्य केंद्रीत केले जात असल्याचे दिसत असून, अजित पवार गुलाबी जॅकेटमध्ये दिसत आहेत.
गुलाबी जॅकेट अन् अजित पवार
अचानक गुलाबी जॅकेट अजित पवारांच्या अंगावर दिसू लागल्याने त्याची चर्चा सुरू झाली. नव्या अंदाजात अजित पवार विधानसभेच्या प्रचारात उतरणार असेही म्हटले जात आहे. पण, हे गुलाबी जॅकेट कसे आले. याबद्दल अजित पवारांनी उत्तर दिले.
हेही वाचा >> 'राज्यातल्या जमिनी विकून पैसे देऊ का?', अजितदादा संतापले
अहमदनगरमध्ये संवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात एका महिलेने अजित पवारांना प्रश्न विचारला.