Sangli Lok Sabha : ठाकरेंची लढाई झाली अवघड; तीन पाटलांमध्ये कोण ठरणार 'भारी'?
Sangli Lok Sabha election 2024 : विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना टपाल तिकीट निवडणूक चिन्हही मिळालं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

विशाल पाटील अपक्ष लढवणार निवडणूक

चंद्रहार पाटील यांच्या विजयाचा मार्ग कठीण
Sangli Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांची सांगली लोकसभा मतदारसंघात लढाई अवघड बनली आहे. या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना विजय मिळवणे सोपे नसणार, हे स्पष्ट झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे आता सांगली लोकसभा मतदारसंघात हायव्होल्टेज लढत बघायला मिळणार आहे. नक्की सांगलीत काय झालं, हे जाणून घ्या...
महाविकास आघाडीत उद्भवलेली पहिलेली बंडखोरी रोखण्यात काँग्रेसच्या नेत्यांना अपयश आले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी माघार घेण्यास नकार दिला. विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवली असून, त्यांना निवडणूक चिन्हही मिळालं आहे. त्यामुळे आता सांगलीत तीन पाटलांमध्ये खरी लढत रंगणार आहे.
चंद्रहार पाटील यांच्या वाटेत 'विशाल' आव्हान
विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरतानाच स्पष्ट केले होते की आता माघार घेणार नाही. उलट महाविकास आघाडीनेच निर्णयाचा फेरविचार करावा. काँग्रेसकडूनही त्याबद्दलचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंना दिला गेला. पण, त्यावर कोणताही निर्णय झाला नाही, अशी माहिती आहे.
हेही वाचा >> शरद पवारांचा नवनीत राणांविरोधात 'सातारा पॅटर्न', मेसेज काय?
या सगळ्यात काँग्रेस नेत्यांकडून विशाल पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. विशाल पाटील यांनी माघार न घेतल्याने आता काँग्रेसकडून त्यांच्यावर कारवाई केली जाईल हे स्पष्ट आहे.