ठाकरे-पवारांसारखा ममता दिदीसोबत मोठा गेम, कोणी घडवला एवढा मोठा भूकंप?

मुंबई तक

Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वीच सत्ता गमावलेल्या ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्षच फुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं.

ADVERTISEMENT

trinamool congress split will mamata banerjee meet same fate as thackeray and pawar ritabrata banerjee bjp west bengal politics
AI फोटो
google news

कोलकाता: पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधी बाकांवर बसलेल्या तृणमूल काँग्रेसमध्ये आता अंतर्गत बंड उफाळून आले असून पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीची तुलना आता तृणमूल काँग्रेसमधील घडामोडींशी केली जात आहे.

निवडणूक पराभवानंतर TMC मध्ये वाढली अस्वस्थता

विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. 15 वर्ष सलग सत्तेत असलेला पक्ष अवघ्या 80 आमदारांवर आला, तर भाजपने 206 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. निकालानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये असंतोष वाढत असल्याचे संकेत मिळत होते.

ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या बैठका आणि आंदोलनांनाही अनेक आमदार व खासदारांनी दांडी मारल्याने पक्षांतर्गत नाराजी उघड होऊ लागली होती.

विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवरून वाद

निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसने शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली होती. फरहाद हकीम यांना मुख्य प्रतोद (चीफ व्हीप) म्हणून नियुक्त करण्यात आले होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत दिसत असतानाच अचानक काही आमदारांनी बंडाचा झेंडा उभारला.

हे वाचलं का?