CM शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार, ‘नालायक’ शब्दावरुन नेमकं काय म्हणाले..?
राज्यातील शेतकरी संकटात असतानाही मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षाच्या राजकीय प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो. त्यामुळे अशा नालायक व्यक्तीला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावरून आता राजकारण तापले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर आता शिंदेंनी जोरदार पलटवार केला आहे.
ADVERTISEMENT
CM Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. कधी मराठा (Maratha) तर कधी ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) वाद टोकाला जात आहेत. तर दुसरीकडे ठाकरे आणि शिंदे गटामुळेही राज्यातील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांनी जहरी शब्दात टीका केली आहे. त्यांनी टीका केल्यानंतर शिंदे-ठाकरे हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी पलटवार करत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची संस्कृती उद्धव ठाकरे विसरले आहेत. त्यामुळे फेसबूक लाईव्ह (Facebook Live) करणाऱ्यांनी मला शिकवण्याची गरज नाही अशा शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
ADVERTISEMENT
कारभार करण्यास नालायक
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार प्रहार केला होता. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, आज माझ्या राज्यातील शेतकरी संकटात असताना, गारपीठ आणि अवकाळीच्या संकटात शेतकरी आहे. मात्र जो माणूस स्वतःच्या घराची काळजी न करता बेपर्वाईने दुसऱ्या पक्षाच्या राजकीय प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो. असा माणूस राज्याचा कारभार करण्यास नालायक आहे. अशा माणसाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असा टोला त्यांनी त्यांना लगावला होता. त्यावरुनच आता राज्याचे राजकारण तापले आहे. कारण मुख्यमंत्र्यांना नालायक शब्द उच्चारल्याने सत्ताधाऱ्यांनी आता विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
हे ही वाचा >> Datta Dalvi : दळवींना अटक, राऊतांचा सुटला संयम; शिंदेंना म्हणाले, चाबकाने…
फेसबूक लाईव्ह करणाऱ्यांनी…
उद्धव ठाकरे यांनी टीका केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. बाळासाहेब ठाकरेंची संस्कृती उद्धव ठाकरे विसरले आहेत. तसेच फेसबूक लाईव्ह करणाऱ्यांनी मला शिकवण्याची गरज नाही अशा शब्दातही त्यांनी त्यांना सुनावले आहे. मी माझं काम करतो आहे. राज्यातील लोकांच्या हिताची काम मी करतो आहे मात्र उद्धव ठाकरे स्वतःच बाळासाहेब ठाकरे यांची संस्कृती विसरले असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
हे वाचलं का?
ही आमची संस्कृती नाही
सध्या उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून टीका करण्याचा एककल्ली कार्यक्रम केला जात असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यांच्यासारखी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे ही आमची संस्कृती नाही. त्यामुळे आमचे काम आम्ही करत आहोत. त्यांनी टीका केली असली तरी महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, सुसंस्कृत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा >> Tunnel Rescue : 41 मजुरांचे जीव वाचवणारा ‘रिअल हिरो’, कोण आहेत रॅट मायनर मुन्ना कुरेशी?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT