Mahavikas Aaghadi : ‘आम्ही भाजपा नामशेष केल्याशिवाय राहणार नाही’ : छ. संभाजीनगरमधून ठाकरेंचा निर्धार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Shiv Sena (UBT) party chief Uddhav Thackeray hit out at BJP-Shinde at the Maha Vikas Aghadi joint meeting in Chhatrapati Sambhajinagar.
Shiv Sena (UBT) party chief Uddhav Thackeray hit out at BJP-Shinde at the Maha Vikas Aghadi joint meeting in Chhatrapati Sambhajinagar.
social share
google news

छत्रपती संभाजीनगर : भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (jJ. P. Nadda) म्हणाले होते, या देशात दुसरा पक्ष शिल्लकच राहताच कामा नाही, अरे पहिले तुम्ही शिवसेनेला (Shiv Sena) पेलून दाखवा. घाव घातलाय ना आता? समोर बसलेले आता कसा घाव घालतील तुमच्यात. अरे भाजप आम्ही नामषेश केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या एकत्रित वज्रमुठ सभेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे नेते उपस्थित होते. (Shiv Sena (UBT) party chief Uddhav Thackeray hit out at BJP-Shinde at the Maha Vikas Aghadi joint meeting in Chhatrapati Sambhajinagar.)

ADVERTISEMENT

काय म्हणाले ठाकरे?

मविआ काळात कोणत्याही धर्मियांना आक्रोश करायची गरज पडली नाही :

भाजप-शिवसेनेने काढलेल्या सावरकर गौरव यात्रेचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, सावरकर यात्रा जरूर काढा. पण हल्ली महाराष्ट्रात हिंदू जनआक्रोश सुरू झाला आहे. मुंबईत कुठून काढला मला माहिती नाही, पण शिवसेना भवनापर्यंत आला होता. या हिंदू जनआक्रोशचा अर्थ एकच आहे, जगातला सर्वात शक्तिमान हिंदू नेता, देशाचा पंतप्रधान झाल्यानंतरही देशातल्या हिंदूंना आक्रोश करायला लागतोय, मग त्या नेत्याची शक्ती काय कामाची आहे? मविआ काळात हिंदू, मुस्लीम अशा कोणत्याही धर्मियांना आक्रोश करण्याची वेळ आम्ही येऊच दिली नव्हती.

हेही वाचा : सावरकरांना दाढी मान्य नव्हती, डॉ.मिंधे गुळगुळीत फिरणार का? संजय राऊतांचा सवाल

‘तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं?’ :

उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्यावर आरोप करतात की मी हिंदुत्व सोडलं. इथे बसलेल्यांपैकी तुम्ही मला एक उदाहरण दाखवा जिथं मी हिंदुत्व सोडलं. मी आत्ता इथून घरी जाऊन बसेन, पुन्हा तुम्हाला तोंड दाखवणार नाही. पण जर मी काँग्रेसबरोबर गेल्यावर हिंदुत्व सोडलं असेल, तर तुम्ही जम्मू-काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती आणि मुफ्ती मोहम्मद सैद यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसलात, तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं. तुमच्याकडून हिं दूमोजपट्टी घेण्याची आम्हाला गरज नाही. तुम्ही म्हणाल तोच हिंदू आणि तुम्ही म्हणाल तोच देशद्रोही अशी तुमची वृत्ती असेल, तर ती गाडण्यासाठी आम्ही वज्रमूठ केली आहे.

हे वाचलं का?

तुम्ही मोदींना घेऊन या, मी माझ्या वडिलांना घेऊन येतो :

यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करण्यावरुन आव्हान दिलं. ते म्हणाले, आपल्या पक्षाचं नाव, चिन्ह चोरलं. माझे वडिलही चोरायचा प्रयत्न करत आहेत. अरे पण स्वत:च्या वडिलांना किती वेदना होत असतील. काय दिवटं कार्ट, याला बापसुद्धा दुसऱ्याचा लागतो. पण एक सांगतो, मी माझ्या वडिलांचं नाव सोडणार नाही. पुन्हा एकदा सांगतो त्यांना, हिंमत असेल, अगदी भाजपातही हिंमत असेल, तर तुम्ही मोदींना घेऊन महाराष्ट्रात या, मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन महाराष्ट्राच्या मैदानात येतो. होऊन जाऊ द्या.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरची दंगल फडणवीसांनी घडवून आणली? शरद पवार म्हणाले…

महिलांविषयी बोलणं खपवून घेतलं जाणार नाही :

मंत्री अब्दूल सत्तार आणि आमदार संजय शिरसाट यांना सुनावताना ठाकरे म्हणाले, छत्रपतींनी कल्याणच्या सुभेदाराची ओटी भरून तिला परत पाठवली होती. ते आमचं हिंदुत्व आहे. पण इथला गद्दार मंत्री सुप्रिया सुळेंना शिवी देतो, हे तुमचं हिंदुत्व? तुमचा एक गद्दार आमदार सुषमा अंधारेंबद्दल खालच्या पातळीची टीका करतो. तुझ्या तोंडून हिंदुत्व बोलायची लायकी नाही. आत्ता जर हे शिवसेनेत असते, तर त्यांची तसं बोलायची हिंमत नव्हती. त्यांना लाथ मारून गेटआऊट म्हटलं असतं. मतं पटत नसतील तर मतांवर बोला. पण महिलांविषयी बोलणं खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा ठाकरेंनी यावेळी दिला.

ADVERTISEMENT

हेही वाचा : सावरकरांच्या त्यागाकडे दुर्लक्ष करू शकत नाही; शरद पवार स्पष्टच बोलले

आम्ही मेंढरासारखं बे बे करत तुमच्या मागून यायचं ही लोकशाही नाही :

यावेळी ठाकरेंनी बोलताना, इस्त्रायलचं उदाहरण देत पंतप्रधान मोदी यांना सुनावलं. ते म्हणाले, इस्त्रायलमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरलेत, पोलीस, सगळे अधिकारी संपावर गेले आहेत. राष्ट्रपतींनीही पंतप्रधानांना झापलं, असे राष्ट्रपती पाहिजेत. तिथं पंतप्रधानांना घराबाहेर पडणं मुश्किल झालं आहे. अखेर त्यांना तो कायदा मागे घ्यायला लागला. याला म्हणतात लोकशाही. आम्ही तुम्हाला निवडून दिलं म्हणजे तुम्ही वाट्टेल ते करावं आणि आम्ही मेंढरासारखं बे बे करत तुमच्या मागून यायचं ही लोकशाही नाही, असं ते म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT