'देशात पुन्हा निवडणूक घ्या', निवडणूक आयोगाच्या मतभेद प्रकरणात उद्धव ठाकरेंची मागणी
Uddhav Thackeray On Election Commission : मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्यात मतभेद झाल्याची घटना आहे. यावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केलेत. शिवसेना UBT उद्धव ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर लोकशाहीचा गळा आवळल्याचा आरोप केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्यात मतभेद
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Uddhav Thackeray On Election Commission : मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्यात मतभेद झालेत. यावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केलेत. शिवसेना UBT उद्धव ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर लोकशाहीचा गळा आवळल्याचा आरोप केला. ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात झालेल्या निवडणुका रद्द करून नव्याने निवडणुका घ्याव्यात, असे ते म्हणाले होते. तसेच भविष्यात निवडणुका मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात अशी मागणी त्यांनी केली होती.
हे ही वाचा : महिलेनं प्रेमप्रकरणातून तीन मुलांना मिठाईत विष मिसळून संपवलं, इंस्टाग्रामद्वारे पुरूषाशी संपर्क
'केंद्रीय गृहमंत्री घोटाळा करत असतील तर त्यांच्यावरही कारवाई करा'
उद्धव ठाकरे म्हणाले की, "काही महिन्यांपासून सर्व विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे अनियमिततेबाबत तक्रारी केली. ज्ञानेश कुमार यांचा हा खरा चेहरा समोर आला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे त्यांनी दावा केला की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एक टोळी लोकशाहीला सुरूंग लावत आहे. या घोटाळ्यामागे नेमकं कोण? असा प्रश्न आता उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. केंद्रीय गृहमंत्री घोटाळा करत असतील तर त्यांच्यावरही खटला चालवून कारवाई केली पाहिजे", असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या फुटीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
पुढे ते म्हणाले की, "अनियमिततेविरोधात शिवसेनेचे सर्वप्रथम आवाज उठवला, असा त्यांनी दावा केला. या अनियमिततेची शिवसेना ही पहिली बळी ठरली आहे. पुढे त्यांनी तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या फुटीचा उल्लेख केला, ज्याला त्यांनी बेकायदेशीर म्हटले आहे. ज्ञानेश्वर यांच्यावर कारवाईची मागणी करत उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्ञानेश कुमार यांना तात्काळपणे तुरुंगात पाठवावे," असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
हे ही वाचा : निवडणूक आयोगात नेमकं चाललंय तरी काय? मोठी खळबळ अन् आता 'ते' पत्रक!
त्यानंतर ते म्हणाले की, "महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसह इतर राज्यांतील नुकत्याच निवडणुका रद्द कराव्यात. ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात ज्या राज्यात निवडणुका झाल्या होत्या, तिथेच पुन्हा निवडणुका घ्याव्यात", अशी मागणी त्यांनी केली.
