कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण? ‘हा’ नवा चेहरा की जुन्याला लागणार लॉटरी!
Karnataka Assembly election 2024 : 13 मार्च रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. पण, त्यापूर्वीच एक प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे, तो म्हणजे कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री कोण होणार?
ADVERTISEMENT

who will be next chief minister of karnataka : राजकारणात रस असणाऱ्या सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती कर्नाटक विधानसभा निवडणुकीची. कारण सत्ता कुणाची येणार, याबरोबरच मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री कोण होऊ शकेल, याबद्दल कोणतीही कल्पना आलेली नाही. असं असलं, तरी काही नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे कर्नाटकचं नेतृत्व नव्या चेहऱ्याच्या हाती जाणार की, जुन्याचीच लॉटरी लागणार, अशी चर्चा सुरू आहे.
कर्नाटकात कोण आहेत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत, कुणाचं पारडं किती जड… बघूयात
सिद्धरामय्या : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरू शकतात मोठा डाव
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या है मैसूर जिल्ह्यातील सिद्धरमनहुंडी येथील आहेत. 2013 ते 2018 या काळात ते कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते. जर कर्नाटकात काँग्रेसला 113 जागा मिळाल्या तर सिद्धरामय्या यांच्या नावाला पक्षाची पहिली पसंती असू शकते.
2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत सिद्धरामय्या मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसने निवडणूक लढवली. त्यावेळी काँग्रेसच्या जागा कमी झाल्या. 122 वरून काँग्रेस 88 वर आली. असं असलं तरी राहुल गांधींची अशी भूमिका आहे की, 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्यास पंतप्रधानांना आव्हान देण्यासाठी कर्नाटक महत्त्वाचं राज्य आहे आणि त्यामुळे सिद्धरामय्या मोठा डाव ठरू शकतात. पण, त्यांना लिंगायत आणि वोक्कालिगा समुदायातून विरोध असल्याचं दिसून आलेलं आहे.