शरद पवार गौतम अदानींना का भेटले? प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केला खुलासा
शरद पवार आणि गौतम अदाणी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. शरद पवारांनी गौतम अदाणींची भेट का घेतली? याबद्दल प्रदेेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले.
ADVERTISEMENT
Sharad Pawar Gautam Adani news in marathi : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदाणी यांची अहमदाबादमध्ये भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. दुसरीकडे भाजपने इंडिया आघाडीला लक्ष्य केलंय. आता भेटीबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे. (Jayant Patil Reactin on Sharad Pawar Gautam Adani Meeting)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदाणी यांच्या भेटीने महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत राजकीय खळबळ उडाली आहे. शरद पवार आणि अदाणी यांची शनिवारी अहमदाबादमध्ये भेट झाली. त्यामुळे भाजपने काँग्रेस आणि इंडिया आघाडीला प्रश्न केले. यासोबतच भाजपने अदाणींच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य करणाऱ्या राहुल गांधींनाही कोंडीत पकडले आहे.
हेही वाचा >> BJP : ‘आता गप्प का?’, शरद पवारांमुळे राहुल गांधी खिंडीत, नेमकं काय घडलं?
शरद पवार अदाणींना वारंवार का भेटत आहेत, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे प्रश्न निराधार असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा केवळ उद्घाटन समारंभ होता आणि दोन गोष्टींची सांगड घालण्याची गरज नाही’, असं जयंत पाटील म्हणाले.
हे वाचलं का?
जयंत पाटील यांनी काय सांगितलं कारण?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अहमदाबादमध्ये गौतम अदानी यांच्या भेटीबाबत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील म्हणाले, ‘इंडिया आघाडीबाबत सर्व चर्चा सर्व नेते करतात, जिथे शरद पवारही उपस्थित असतात. उद्घाटनाचा प्रश्न आहे, तर शरद पवार त्यांना (गौतम अदाणी) ओळखतात आणि त्यांनी (अदाणी) पवारांना आमंत्रित केले होते. नव्या गुंतवणुकीचे हे उद्घाटन होते. यात आक्षेप घेण्याची गरज नाही. हा फक्त एक प्रकल्प होता जिथे शरद पवारांनी जाऊन उद्घाटन केले. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयांना शरद पवार यांनी नेहमीच पाठिंबा दिला आहे. दोन गोष्टींची सरमिसळ करण्याची गरज नाही.’
अहमदाबादमध्ये शरद-अदाणी यांची भेट झाली
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदाणी यांच्यासोबत दिसले. ते एका कार्यक्रमासाठी अहमदाबादला गेले होते. कार्यक्रमातील फोटो समोर आला, ज्यात पवार हे रिबन कापत असून, त्यांच्या शेजारी अदाणी दिसत आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ‘शरद पवारांचे दोन नेते आमच्याकडे येणार’, गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट
त्यांचा हा फोटो लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला. या भेटीवरून राजकीय क्षेत्रात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदाणी यांच्यात शनिवारी म्हणजे 23 सप्टेंबर रोजी अहमदाबादमध्ये भेट झाली. निमित्त होते भारतातील पहिल्या लॅक्टोफेरिन प्लांटच्या उद्घाटनाचे, त्यानंतर शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्या घरी आणि कार्यालयालाही भेट दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT