‘सटर-फटर लोकांमुळे..’, ठाकरे गट सोडताच नीलम गोऱ्हेंनी सुषमा अंधारेवर केली टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुंबई: ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शिवसेनेला आज (7 जुलै) शिंदे गटाने (Shinde Group) मोठा धक्का दिला. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनाच गळाला लावत शिंदेंनी ठाकरे गटाला आणखी एक खिंडार पाडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनेतील पक्ष प्रवेश पार पडला. याच पक्ष प्रवेशानंतर निलम गोऱ्हे यांनी थेट शिवसेना (UBT) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर टीका केली आहे. (thackeray group deputy speaker legislative council neelam gorhe strongly criticized sushma andhare shinde group bjp withdrawn no confidence motion against him)

सुषमा अंधारे पक्षात आल्यामुळे आपली नाराजी आहे का? असा सवाल निलम गोऱ्हे यांना जेव्हा विचारण्यात आला तेव्हा त्यांनी थेट सुषमा अंधारे यांना सटर-फटर म्हणत त्यांच्यावर टीका केली.

‘सटर-फटर लोकांमुळे नाराज होण्यासारखी परिस्थिती नाहीए’

यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ‘तुम्ही 2000 पासून आम्हाला पाहता आहात. असं आमच्या पक्षामध्ये नाराजी वैगरे असं कुठेच नसतं. नाराजी वैगरे असली तरी पक्षाचे नेते आले की, पक्षाचे नेते आले की ती नाराजी विसरत असतात. त्यातून सटर-फटर लोकांमुळे नाराज होण्यासारखी परिस्थिती नाहीए.’ अशी थेट टीका त्यांनी केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Samruddhi Accident : ‘त्या’ बस अपघाताबद्दल मोठी अपडेट! चालकाच्या रक्तात सापडले…

दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेत त्यांनी का प्रवेश केला याबाबत त्या म्हणाल्या की, ‘सद्य स्थितीत सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाने स्पष्ट निकाल दिला आहे की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच अधिकृत आहे.’ असंही गोऱ्हे म्हणाल्या.

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच निलम गोऱ्हेंवरील अविश्वास प्रस्ताव भाजपने घेतला मागे

कामकाज सल्लागार बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रविण दरेकर यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. भाजपचेच आमदार प्रसाद लाड यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं आहे.

ADVERTISEMENT

नीलम गोऱ्हे यांचा राजकीय प्रवास

नीलम गोऱ्हे या आयुर्वेदाच्या डॉक्टर आहेत. आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत असतानाच 1977 मध्ये ‘युक्रांद’मध्ये प्रवेश केला होता. युक्रांदमधील फुटीनंतर 1983 साली त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या ‘भारिप’मध्ये प्रवेश केला होता. भारिपकडून त्यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती. 1994 साली त्यांनी भारिपला सोडचिठ्ठी देत आठवले गटात प्रवेश केला होता. आठवले गटातून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2002 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. ज्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून पाठविण्यात आलं होतं. तसंच फडणवीस सरकारच्या काळात त्यांना शिवसेनेचे विधानपरिषदेचं उपसभापती पदही दिलं होतं. जे आताही कायम आहे. असं असताना आज (7 जुलै) त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Beed : अजित पवारांच्या बंडामुळे धनंजय मुंडे-पंकजा मुंडेंचं मिटलं ‘वैर’!

विधानपरिषदेत ठाकरेंची ताकद झाली कमी

मनिषा कायंदे पाठोपाठ थेट विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोऱ्हे यांनीच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं विधान परिषदेतील संख्याबळ घटलं आहे. तसंच तांत्रिकदृष्ट्या देखील विधानपरिषदेत शिंदेंची ताकद यामुळे वाढणार आहे. सर्वात आधी विप्लव बाजोरिया यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर मनिषा कायंदे या दुसऱ्या आमदार होत्या. त्यानंतर आता नीलम गोऱ्हे यांनीही शिंदेंच्या सेनेची वाट धरली आहे. त्यामुळे तीन आमदार ठाकरेंचे कमी झाले आहेत.

आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विधान परिषदेत 8 आमदार राहिले आहेत. यात सचिन अहिर, आमश्या पाडवी, उद्धव ठाकरे, अनिल परब, सुनील शिंदे, अंबादास दानवे, नरेंद्र दराडे आणि दुष्यंत चतुर्वेदी या आमदारांचा समावेश आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT