Mumbai Tak /बातम्या / ‘आमदार-खासदारांना खोके मिळतात, पण..’, ठाकरेंचं शिंदेंच्या वर्मावर बोट
बातम्या राजकीय आखाडा

‘आमदार-खासदारांना खोके मिळतात, पण..’, ठाकरेंचं शिंदेंच्या वर्मावर बोट

Uddhav Thackeray Vs Eknath shinde, Maharashtra budget Session: मुंबई: अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी विरोधकांकडून होतेय. याच मागणीवरून शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. खोक्यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदेंच्या वर्मावर बोट ठेवलं.

सामना अग्रलेखात ठाकरेंनी काय म्हणलंय?

-“महाराष्ट्रात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न कमी व राजकीय मुद्देच जास्त उचलले जात आहेत. बुधवारी सकाळी विरोधी पक्षनेत्यांनी अवकाळी नुकसानीचा मुद्दा विधानसभेत उचलून सरकारला धारेवर धरले, तेव्हा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांनाच बजावले. ‘राजकारण करू नका, तुम्ही राजकारण करणार असाल तर मग आम्हालाही करावे लागेल. मागच्या चक्रीवादळाच्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही,’ असा बाण फडणवीस यांनी सोडला. त्यांचे हे बोलणे म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर नसल्याचे उदाहरण आहे.”

मोदी-शाह महाराष्ट्राला ठेंगा दाखवून निघून गेले – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

-“राज्याला जेव्हा चक्रीवादळाचा तडाखा बसला, त्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले तेव्हा कोरोना काळ होता. त्या वेळी महाराष्ट्राच्या तिजोरीवर मोदींचे सरकार भुजंगासारखे बसून राहिले होते. चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा वगैरे तत्काळ गुजरातेत पोहोचले, पण त्यांनी नुकसानग्रस्त महाराष्ट्राकडे पाठ फिरवली. गुजरातला चक्रीवादळाची भरपाई म्हणून तत्काळ 1500 कोटी की काय ते दिले. पण महाराष्ट्राला ठेंगा दाखवून निघून गेले व त्यानंतर या ठेंगेवाल्यांनी महाराष्ट्राचे सरकारच खोके मोजून पाडले. फडणवीस यांनी राजकारणाचा संदर्भ दिला म्हणून ही माहिती दिली.”

Narayan Rane: ‘शिंदे.. कोणाला पैसे नेऊन देत होते?’, राणेंचे ठाकरेंवर आरोप

“पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या चुली विझल्या. महाराष्ट्रातले सरकार भ्रष्ट सत्ताकारणात मश्गुल असताना शेतकरी अशा पद्धतीने हवालदिल झाला आहे. फळबागा नष्ट झाल्या व सरकार जुहूच्या पंचतारांकित हॉटेलपासून ठाण्यापर्यंत ‘रंग बरसे’ होळी खेळत राहिले. आता म्हणे मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. फुटीर आमदार – खासदारांना ‘खोके’ मिळतात, पण शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची मदत मिळेल काय? हा प्रश्नच आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या खिजगणतीत तरी अवकाळी पावसाचे हे नुकसान आहे काय?”

सरकारला याची शुद्ध आहे काय?, शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र

-“सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री धुळवडीत रंगून गेले असतानाच राज्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, पण सरकारला याची शुद्ध आहे काय? शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे काय? महाराष्ट्राचा कृषी विभाग अशा वेळी नेमके करतो काय? महसूल खात्याची यंत्रणादेखील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचते काय? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.”

“महाराष्ट्राच्या डोक्यावर जसे अवकाळी सरकार आले, तसे अवकाळी पावसाचे संकट राज्यावर कोसळले आणि त्याने हजारो हेक्टर शेतीतील उभे पीक आडवे केले. हे नुकसान सरकार कसे आणि कधी भरून काढणार, हा बळीराजासमोरचा मोठा प्रश्न आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पाठीराख्या चाळीस आमदारांचीच चिंता आहे. बाकीची जनता त्यांना महत्त्वाची वाटत नाही.”

Exclusive : नागालँडमध्ये राष्ट्रवादी BJP सोबत; महाराष्ट्रात ‘मविआ’ फुटणार?

“देशभरात धुलीवंदन उत्साहात साजरे झाले. महाराष्ट्रात या उत्साहाची भांग सत्ताधाऱ्यांना जरा अतीच चढली होती. भांग पिऊन नाचण्यासाठी खास दिल्लीहून निमंत्रित बोलावले होते. धुलीवंदनाचा जलसा जुहूच्या पंचतारांकित हॉटेलात सुरू होता. त्याच वेळी महाराष्ट्राचा शेतकरी अवकाळी आणि गारपिटीने उद्ध्वस्त होत होता. हे चित्र विदारक आहे.”

“सत्तेची भांग चढली की राज्यकर्ते असेच बेफाम वागतात”

-“हेच चित्र विरोधकांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर मांडले. त्यामुळे तरी धुळवडीच्या ‘गुंगीत’ असलेल्या सरकारने जागे व्हायला हवे. विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नी शुद्धीत आहे. सरकार मात्र भांग ढोसून पडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सत्तेची भांग चढली की राज्यकर्ते असेच बेफाम वागतात. महाराष्ट्रात आज तेच चित्र आहे!”

---------
कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम