Mumbai Tak /बातम्या / Mumbai: ‘पोरगा झाला, माझ्यामुळेच झाला’, फडणवीसांच्या ठाकरेंना कानपिचक्या
बातम्या मुंबई राजकीय आखाडा

Mumbai: ‘पोरगा झाला, माझ्यामुळेच झाला’, फडणवीसांच्या ठाकरेंना कानपिचक्या

Devendra Fadnavis । Uddhav Thackeray। eknath shinde। Mumbai Projects : मुंबईतील विविध 320 विकासकामांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. मुंबईतील विकास कामांचं श्रेय घेण्यावरून देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत.

मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सरकार आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बैठक घेतली. त्या बैठकीत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना असे आदेश दिले की, मुंबईत परिवर्तन झालं पाहिजे. आपण म्हणतो की, आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. खूप संसाधने आहेत, बँक बॅलन्स आहे. पण महापालिका ही काही बँकेत पैसे गुंतवून त्याच्या व्याजावर जगण्यासाठी निर्माण झालेली नाही. महापालिका जनतेचा पैसा जनतेच्या कल्याणाकरिता वापरण्यासाठी तयार झाली आहे. त्यामुळे जनतेचा पैसा जनतेकरिता तुम्ही लावा, असं स्पष्ट निर्देश दिले. सातत्यानं मुंबईतील समस्या दूर करण्यासाठी हा प्रकल्प सुरू झाला.”

“पावसाळ्यात तीन ते चार महिन्यात माध्यमांत मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यांची चर्चा असते. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या महापालिकेकडे इतका पैसा आहे, 25-25 वर्ष महापालिकेवर राज्य केल्यानंतर साधे रस्ते नीट करता येत नाही. कारण रस्ते चांगले करण्याचा उद्देशच नव्हता. खड्डे बुजवायचे, डांबर टाकायचं. पुन्हा तेच खड्डे बुजवायचे. वर्षानुवर्षे एकाच रस्त्यावर पैसे खर्च करायचे आणि तरी जनतेला दरवर्षी खड्ड्यांमध्ये टाकायचं ही निती पुर्णपणे समाप्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“युद्धाला तोंड फुटेल”, संजय राऊतांचा अमित शाह-नरेंद्र मोदींवर हल्ला

मुंबई महापालिकेच्या एफडी : फडणवीस म्हणाले, ‘जनतेचा पैसा जनतेसाठी वापरणार’

“एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दोन वर्षात हे काम पूर्ण होऊ शकतं, तर 25 वर्षात हे काम का पूर्ण झालं नाही, याचा सवाल कुणाला तरी विचारावा लागेल ना? मला तर आश्चर्यच वाटलं की, काही लोक म्हणताहेत बँकेतील पैसे का खर्च करता आहात. मी त्यांना विचारू इच्छितो की, हा जनतेचा पैसा बँकेत ठेवला की त्यावर 3-4 टक्के व्याज मिळत. म्हणजे त्या पैशांचं मूल्य तुम्ही कमी करत आहात. तेच जर पैसे जनतेच्या हिताकरिता लावले, तर जनतेला चांगलं जीवनमान देता येत. पण, यांना बँकेत पैसे याकरिता ठेवायचे आहेत की, ज्या प्रोजेक्टमधून माल मिळतो, ज्या प्रोजेक्टमधून मलई मिळते असे प्रोजेक्ट हातामध्ये घ्यायचे. आता हे चालणार नाही. जनतेचा पैसा जनतेकरिता वापरला जाईल”, असं म्हणत एफडी मोडण्यावरून होत असलेल्या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिलं.

“मुंबईच्या समुद्रात आपण सांडपाणी, विष्टेचे पाणी रोज सोडायचो. मुंबईचा समुद्र आणि पर्यावरण खराब करत होतो. मी मुख्यमंत्री असताना केंद्राकडून सर्व परवानग्या आणल्या. तरी देखील ते काम होऊ शकलं नाही. शिंदेंच्या नेतृत्वात सरकार आलं आणि आपण ते काम देऊन टाकलं. त्याची सुरुवात झालीये. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपला समुद्रकिनारा निर्मळ दिसेल. वास येणार नाही, घाण दिसणार नाही. परदेशातील समुद्रकिनाऱ्याप्रमाणे मुंबईतील समुद्रकिनारा दिसेल”, अशी ग्वाही फडणवीसांनी यावेळी दिली.

Narayan Rane: ‘अजित पवार पुण्याला येऊन बारा वाजवीन मी’, ‘त्या’ विधानावरुन राणे संतापले

काहीही झालं की मीच केलं…, फडणवीस ठाकरेंचं नाव न घेता काय म्हणाले?

“मुख्यमंत्री महोदय, एक गोष्ट मला समजलीच नाही की, आपण कुठलंही काम सुरू केलं की, काही लोक म्हणतात, आमच्याच काळात झालंय. अरे अडीच वर्षांपैकी दोन वर्ष तर ते दरवाजाच्या आतच होते. बरोबर ना. अडीच वर्षांपैकी दोन वर्ष दरवाजाच्या आतच होते. कुठलंही काम आम्ही हातामध्ये घेतलं की, म्हणतात आमच्याच काळातील आहे. हे तर असं झालं की, काही लोकांची सवय कशी असते की, (हे म्हणता फडणवीस म्हणाले याला शब्दशः घेऊ नका, नाहीतर अलिकडच्या काळात एखादी कोटी केली की, त्याला चुकीच्याच पद्धतीने घेतात.) याची अॅडमिशन झाली, मीच केली. नोकरी लागली, मीच लावली. लग्न झालं, मीच जुळवून दिलं. अरे पोरगा झाला, माझ्यामुळेच झाला. ही जी काही सवय आहे, ही सोडली पाहिजे. पोरगा झाला, तर त्याच्या कर्तृत्वाने झाला आहे. लग्न झालं असेल, तर त्याने त्याच्या पसंतीने केलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, मीच केलं, आम्हीच केलं ही जी प्रवृत्ती अलिकडच्या काळात पाहायला मिळते. अरे तुमच्या काळात काहीच झालं नाही म्हणून तर मुंबईची अवस्था अशी आहे”, अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली.

Shiv Sena: शिंदे मराठा, मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली: गुलाबराव पाटील

देवेंद्र फडणवीसांनी मागितली मुंबईकरांची माफी

“आज हे सर्व करत असताना मुंबईकरांची क्षमा देखील आम्हाला मागायची आहे. कारण आम्ही एकावेळी इतकी कामं सुरू केली आहेत की, तुम्हाला त्रास होतोय. होणार आहे. पण काही काळ त्रास सहन करा, कारण आता सगळ्या रस्त्यांची कामं सुरू आहेत. सगळीकडे सौंदर्यीकरण सुरू आहे. एका वेळी इतकी कामं हाती घेतली आहेत की, त्यामुळे थोडं प्रदूषण देखील होत आहे. त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅमही होतंय. काळजी करू नका. दोन तीन वर्षात सगळी कामं संपल्यानंतर आपल्याला कधीही हा प्रॉब्लेम तयार होणार नाही. मला मुंबईकर हा त्रास सहन करतील आणि आम्हाला माफ करतील”, असं म्हणत फडणवीसांनी माफी मागितली.

---------
‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान