Nitesh Rane: “दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणाला उद्धव ठाकरेच जबाबदार, कारण…”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीच्या सुशोभीकरणाचा उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण २०२०-२१ मध्ये झालं. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यामुळे दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणाला उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत असा आरोप नितेश राणेंनी केला आहे.

याकूब मेमनची कबर चर्चेत! पण लादेन, अजमल कसाब आणि अफझल गुरू या दहशतवाद्यांच्या मृतदेहांचं काय झालं?

नेमकं काय म्हटलंय नितेश राणेंनी याकूब मेमनच्या कबरीबाबत?

“याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण हे २०२०-२१ मध्ये झालं आहे. त्यावेळी कुणाचं सरकार महाराष्ट्रात होतं? महापालिकेत कुणाची सत्ता होती? कोव्हिडच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. २०२०-२१ मध्ये दहशतवाद्याच्या कबरीचं सुशोभीकरण होणं याची थेट जबाबदारी त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंचीच आहे. तेच सरकारचे प्रमुख होते. त्यांचाच पक्ष मुंबई महापालिका चालवत होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Aditya Thackeray : लादेनसारखा याकूब मेमनचा मृतदेह समुद्रात दफन का केला नाही?

व्होरा कमिटीचा अहवाल का समोर आणत नाही?

आज जे देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांचे फोटो दाखवून ओरड करत आहेत त्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की व्होरा कमिटीचा अहवाल तुम्ही सार्वजनिक का करत नाही? कुणाचे संबंध दाऊदशी आहेत? कुणाचे संबंध याकूब मेमनसोबत आहेत? हे पुराव्यासहीत समोर येईल.” असा आरोपही नितेश राणेंनी केला आहे.

ADVERTISEMENT

काय आहे याकूब मेमनच्या कबरीचं प्रकरण?

याकूब मेमनच्या कबऱीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत याकूब मेमनची कबर लाईट लावून सजवण्यात आली आहे. तसंच त्या कबरीला मार्बल लावण्यात आलं आहे असं दिसतं आहे. याकूब मेमनला पाच वर्षांपूर्वी फाशी देण्यात आली. त्यानंतर मुंबईतल्या बडा कब्रस्तान या ठिकाणी त्याचा अंत्यविधी झाला. फाशी देण्यात आल्यानंतर पोलिसांना याकूबचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला होता. मरीन लाईन्स स्टेशनजवळ असलेल्या बडा कब्रस्तान भागात याकूब मेमनचं पार्थिव दफन करण्यात आलं.

ADVERTISEMENT

भाजप आमदार राम कदम यांनी काय म्हटलं?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्या काळात मुंबईत पाकिस्तानच्या इशाऱ्यावर १९९३ मध्ये बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीला आता मजारचं स्वरूप आलं आहे. हेच का उद्धव ठाकरेंचं मुंबई प्रेम? हीच का यांची देशभक्ती? उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी या सगळ्यांनी याबाबत माफी मागावी अशी मागणी भाजपने केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT