राड्यानंतर महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसवून आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये

मुंबई तक

प्रभादेवी येथे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील शिवसैनिक आपापसात भिडले होते. यानंतर ठाकरे गटाचे शाखाप्रमुख महेश सावंत यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी महेश सावंत आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. शिवसैनिक हाच शिवसेनेचा ब्रह्मास्त्र आहे, असे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

प्रभादेवी येथे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील शिवसैनिक आपापसात भिडले होते. यानंतर ठाकरे गटाचे शाखाप्रमुख महेश सावंत यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी महेश सावंत आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. शिवसैनिक हाच शिवसेनेचा ब्रह्मास्त्र आहे, असे कौतुकाचे बोल उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवले. तसेच यावेळी महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या जवळील खुर्चीवर बसवून आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये खाली बसलेले पाहायला मिळाले.

मध्यरात्री दोन्ही गटात तुफान राडा झाल्यानंतर दादर पोलीस स्टेशनसमोर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होते. उद्धव ठाकरे यांच्या 25 समर्थकांनावर गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक करण्यात आली होती. ज्यामध्ये महेश सावंत यांचा देखील समावेश होता. यानंतर या सर्व शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावले होते. यावेळी त्यांनी महेश सावंत यांच्यासह इतर शिवसैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसंच शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रह्मास्त्र असल्याचं ते म्हणाले.

आमच्या सयंमाचा बांध फुटला : महेश सावंत

गेल्या दोन महिन्यांपासून आम्हाला डिवचण्याचं प्रयत्न सरवणकर यांचे समर्थक करत होते. आम्ही तेव्हांपासून त्यांना आवरा, असं पोलिसांना सांगत होते. मात्र, ते काही शांत बसले नाही. ते आमच्या अंगावर आले आणि त्यात पोलीस देखील जखमी झाले. मग आम्ही त्यांना आमची ताकद दाखवून दिली. दोन महिने झाले ते आम्हाला डिवचत होते, मग आमच्या संयमाचा बांध फुटला, असं महेश सावंत म्हणाले. तसेच आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचं देखील सावंत यांनी बोलून दाखवलं.

गोळीबार केल्याच्या आरोपावर सदा सरवणकर यांचा खुलासा; शिवसेनेवरच केला आरोप

हे वाचलं का?

    follow whatsapp