Narayan Rane :"शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता गप्प बसून आराम करावा"

संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे अशीही टीका नारायण राणे यांनी केली
Narayan Rane :"शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता गप्प बसून आराम करावा"

महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्याला उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे जबाबदार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असून स्वतःचा पक्ष आणि आमदार वाचवू शकले नाहीत असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता गप्प बसून आराम करावा असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.

Narayan Rane :"शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता गप्प बसून आराम करावा"
आमच्याच लोकांचं रक्त सांडवायचं नाही, आम्ही मार्ग काढू; संजय राऊत नाशिकमध्ये काय म्हणाले?

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारकडे कोणते प्रश्न सोडवले असा प्रश्न उपस्थित करत नवीन सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच लोक कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी काम करेल असा विश्वास राणेंनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता सावंतवाडीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे तर संजय राऊत यांना गप्प बसून आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

Narayan Rane :"शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता गप्प बसून आराम करावा"
Uddhav Thackeray: "धनुष्यबाण शिवसेनेचाच आहे, शिवसेनेचाच राहणार"

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची मानसिक स्थिती ढासळली आहे. त्यामुळे आता त्यांनी तोंड गप्प करावं, ज्यांना मुख्यमंत्री असताना सुद्धा स्वतःचे आमदार सांभाळता येऊ शकले नाही ते मतदार काय सांभाळणार ? महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जनतेचे कुठले प्रश्न सोडवले हे सांगा? असाही प्रश्न नारायण राणेंनी विचारला आहे. नारायण राणेच्या घराला नोटीस बजावण्याचं काम त्यांनी केले. अडीच वर्षांमध्ये स्वतःच्या आमदार खासदारांना आठ आठ तास भेटण्यासाठी तातडीने ठेवायचं, त्यांची कामं करायची नाही हेच त्यांनी केलं.

फक्त मातोश्रीच्या आप्त स्वकियांची काम करायची हा एक कलमी भ्रष्टाचार त्यांनी केला. आपण वेळोवेळी महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे सांगत आलो होतो कारण मला आधीच याची कल्पना होती. आता शिवसेनेच्या चिन्हावरून उभा राहिलेला प्रश्न कायद्याच्या बाबीवर अवलंबून आहे. येत्या ११ तारखेला होणाऱ्या निर्णयानंतर पुढील हालचाली घडून येतील. नवीन सरकार येथील जनतेचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबरच हे राज्य लोक कल्याणकारी राज्य बनावे यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे, नवीन मंत्रिमंडळामध्ये नितेश राणे यांना संधी असेल का याबाबत त्यांना विचारले असता त्याची यादी शिंदे आणि फडणवीस दिल्लीला घेऊन गेल्याचं त्यांनी सांगितलं.

मी मुख्यमंत्री असताना माझा दरारा होता. आपण सभागृहामध्ये शिस्त ठेवली होती. आता केंद्रीय मंत्री पदाला एक वर्ष पूर्ण झाले आहे येणाऱ्या काळात या ठिकाणी उद्योगधंदे आणि बेकारी संपवावी असे काम आपण करणार आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून केसरकर यांनी बजावलेली भूमिका याबाबत मंत्री राणे यांना दिवस आले असता आपण अनेक प्रवक्ते बघितले त्यापैकी केसरकर एक आहेत. केवळ प्रश्न विचारणे आणि उत्तर देणे हा त्यांचा कार्यक्रम त्यामुळे केसरकर हे प्रवक्ते म्हणूनच राहोत असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in