उद्धव ठाकरेंना सल्ला, एकनाथ शिंदेंना ऑफर; आंबेडकरांच्या मनात नेमकं काय? - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / उद्धव ठाकरेंना सल्ला, एकनाथ शिंदेंना ऑफर; आंबेडकरांच्या मनात नेमकं काय?
बातम्या राजकीय आखाडा

उद्धव ठाकरेंना सल्ला, एकनाथ शिंदेंना ऑफर; आंबेडकरांच्या मनात नेमकं काय?

maharashtra political news in marathi : warned to uddhav thackeray and offer to eknath shinde, what is in prakash ambedkar mind?

‘महाविकास आघाडीच्या नादी लागू नका, अन्यथा तुमचा बळी जाईल’ असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. भांडूपमध्ये झालेल्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.याच भाषणामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील एकत्र येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या मनात नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

वंचित बहुजन आघाडीला मविआमध्ये घ्यायचं की नाही याबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. वंचित बहुजन आघाडी हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मित्र पक्ष असल्याने ठाकरेंच्या वाट्याला येणाऱ्या जागांमधून त्यांनी वंचितला जागा द्याव्या, असा मविआच्या नेत्यांचा सूर आहे. 10 महिन्यांवर लोकसभेची निवडणूक आल्याने मविआच्या जागावाटपाच्या चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत. आता यात वंचितला सोबत घेतलं जाणार की नाही असा प्रश्न आहे. त्याचबरोबर जागा वाटपावरुन मविआत कुरबुरी देखील सुरु झाल्या आहेत.

अशातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादात शिवसेनेचा बळी जाऊ देऊ नका असं प्रकाश आंबेडकर म्हणतायेत. एकप्रकारे उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर पडण्यासाठीच प्रकाश आंबेडकर सुचवत आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यावर शरद पवारांनी सध्या तरी बोलणं टाळलं आहे.

प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदेंना कोणती ऑफर दिली?

दुसरीकडे याच सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदेंच्या भेटीबाबतही अनेक खुलासे केले आहेत. रिक्षावाला मुख्यमंत्री झाल्याचा आनंद असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्याचबरोबर शिंदेंनी भाजपची साथ सोडून वंचितसोबत यावं, अशी खुली ऑफरही आंबेडकरांनी यावेळी दिली. आंबेडकर या भाषणात काय म्हणाले तेच विधान नेमकं काय?

“आतापर्यंत श्रीमंतांची माणसं झाली (मुख्यमंत्री). एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला यातच आमचा आनंद आहे. मी म्हणण्यापेक्षा शिंदेंच म्हणाले की, प्रकाशराव ही घटना आहे म्हणून झालो, ‘नाहीतर आपल्याला कुणीच विचारलं नसतं.’ मी त्यांना म्हणालो, तुमचे मित्र… त्यांचं काय? ते म्हणाले, ‘अवघड दुखणं असतं प्रकाशराव.’ मी त्यांना म्हणालो पडा बाहेर आपण एकत्र येऊ’, असं प्रकाश आंबेडकर या सभेत म्हणाले.

हेही वाचा >> Vilasrao Deshmukh : विलासरावांनी ‘हात’ दिला अन् गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते झाले

एकीक़डे प्रकाश आंबेडकर ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणुका लढवण्याची तयारी करत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना देखील भाजपची साथ सोडून सोबत येण्याची ऑफर देतायेत. या आधी देखील प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांची अनेकदा भेट झाली आहे. या भेटीची कारणं वेगवेगळी असली तरी त्यात राजकीय परिस्थितीवर देखील चर्चा झाली आहे.

२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्याप्रमाणावर वंचितने मतं मिळवली होती. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये वंचितचे उमेदवारांनी दुसऱ्या क्रमाकांची मतं घेतली होती. त्यामुळे वंचितला सोबत घेणं राजकीय पक्षांना महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा >> ‘महिलेसोबत नको त्या अवस्थेत…’, खडसे महाजनांवर टीका करताना काय बोलले?

अशातच आता प्रकाश आंबेडकर ठाकरे आणि शिंदेंना सोबत येण्याच्या ऑफर देत आहेत. ठाकरे आणि शिंदे येत्या काळात एकत्र येणं अवघड असलं तरी राजकारणात काहीही अशक्य नसतं असं बोललं जातं, त्यामुळे आंबेडकरांच्या या ऑफरमुळे येत्या काळात राज्यात काय राजकारण रंगतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट! Shruti Marathe च्या घायाळ करणाऱ्या अदांवर, चाहते फिदा! साधं राहणीमान असणाऱ्या Ratan Tata कडे आहेत ‘या’ खास वस्तूचं कलेक्शन Swara Bhaskar ने दिली Good News! शेअर केले खास Photo