Sudhir Mungantiwar : "भावाला बहिणीसोबत कपडे उतरवून...", मुनगंटीवार मोठ्या वादात
Sudhir Mungantiwar Controversy : "सख्ख्या भावाला सख्ख्या बहिणीसोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेसवाले", असे विधान मुनगंटीवार यांनी केले.

ADVERTISEMENT
Sudhir Mungantiwar Controversy Video : चंद्रपूरच्या प्रचार सभेतील सुधीर मुनगंटीवारांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना 'सख्ख्या भावाला बहिणीसोबत कपडे उतरवून झोपवणारे काँग्रेसवाले', असे विधान मुनगंटीवार केले. मुनगंटीवारांच्या भाषणाची ही क्लीप व्हायरल होत असून, विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेचे बाण डागले जात आहेत. (Sudhir Mungantiwar Controversial Video Goes viral)
सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर वणी आर्वी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी (९ मार्च) सभा घेतली. याच सभेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. त्यात त्यांनी केलेल्या विधानाने वाद उभा राहिला आहे.
सुधीर मुनगंटीवार वादग्रस्त विधान... वाद का?
कॉंग्रेसच प्रवक्ते संचिन सावंत मुनगंटीवारांचा हा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय की, "निवडणूक आयोगाने तात्काळ सुधीर मुनगंटीवार यांच्या या भाषणाची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. अशा तऱ्हेची विखारी भाषा खपवून घेतली जाऊ नये. 'एका भावाला बहिणीबरोबर' सारखे भयंकर व बेफाम आरोप मुनगंटीवार यांनी केले. हरण्याच्या भीतीने तोल ढळला आहे. नुकतेच 'आप'च्या मंत्री आतिशी यांनी भाजपाने त्यांना पक्षात प्रवेश करावा अशी ऑफर दिली असा आरोप केला, तेव्हा निवडणूक आयोगाने आतिशींना नोटीस पाठवली. जगनमोहन रेड्डी यांना तसेच सुप्रिया श्रीनेत यांना नोटीस पाठवली."
हेही वाचा >> मविआचा तिढा अखेर सुटला; कोणती जागा कुणाला, वाचा संपूर्ण यादी
पुढे सचिन सावंत म्हणतात, "केंद्रीय निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन सहन केले जाणार नाही असे म्हटले आहे. राज्य निवडणूक आयोग या विधानांवर निवडणूक आयोगाच्या मतानुसार कारवाई करतील ही अपेक्षा. मुनगंटीवार यांच्या या भाषेला आणि खोट्या आरोपांना त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. आम्हाला केवळ सत्य सांगावे लागेल", असा इशारा त्यांनी दिला.
