Ramgiri Maharaj: 'भगव्या रंगाचा श्वानही असतो..', रामगिरी महाराजांना लफंगा म्हणत मिटकरींची तुफान टीका
Amol Mitkari vs Ramgiri Maharaj: रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आमदार अमोल मिटकरी जोरदार टीका केली. तसंच त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी अशी मागणीही केली आहे.
ADVERTISEMENT
Amol Mitkari vs Ramgiri Maharaj: रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आमदार अमोल मिटकरी जोरदार टीका केली. तसंच त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी अशी मागणीही केली आहे.
Amol Mitkari मुंबई: महंत रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर छ. संभाजीनगर आणि अहमदनगर येथे तणाव निर्माण झाला होता. याच प्रकरणात रामगिरी महाराज यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला. पण त्यानंतर रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच व्यासपीठावर दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. असं असताना आता महायुती सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी रामगिरी महाराजांवर जहरी टीका केली आहे. (even a dog is saffron in color but it does not make a saint mla amol mitkari stormy criticism of ramgiri maharaj called as lafanga)
रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. या वक्यव्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यात लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळी आंदोलकांनी रामगिरी महाराज यांच्या अटकेची मागणी केली होती. तसेच काही ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही घडल्या होत्या. या सगळ्या घटनेबाबत बोलताना महायुती सरकारमधील आमदार अमोल मिटकरींनी त्यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी केली आहे.
'भगव्या रंगाचा श्वानही असतो... पण तो संत बनत नाही', मिटकरी रामगिरींवर संतापले
'असं आहे की, त्यांना काही लोकं संत म्हणायला लागले आहेत. भगवे कपडे घातल्यानंतर जर कोणी संत झाला असता तर अनेक श्वानांचा रंग सुद्धा भगवा आहे. यासाठी प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं.. 'भगवे श्वान जरी सहज वेष त्याचा..' त्यामुळे भगव्या रंगाचा श्वान जसा कधी संत होऊ शकत नाही. तसं भगवं परिधान केलेला प्रत्येक व्यक्ती हा संत असू शकत नाही.. यापूर्वी देखील धर्माच्या नावाखाली जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.'
'माझं म्हणणं आहे की, बांग्लादेशमध्ये जे अत्याचार सुरू आहेत त्याचं कोणी समर्थन करत नाही. पण बांग्लादेशच्या अत्याचाराचा आणि भारताचा संबंध काय? कोण भारतातील वातावरण खराब करतंय.. कोणत्या मुसलमानाने हिंदू धर्माबाबत अपशब्द काढले आहेत? किंवा कोणत्या हिंदूने मुस्लिमांबाबत अपशब्द काढलेत.'
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Ramgiri Maharaj : रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
'असं काही नसताना.. जर आपण हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगत असताना.. हिंदू धर्मातील चांगल्या गोष्टी सांगा ना.. अशा पद्धतीने हजरत मोहम्मद पैंगबर.. जे इस्लाम धर्माचं श्रद्धास्थान आहे त्यांच्याबाबत एवढ्या अश्लील भाषेत बोलताना या महाराजांना जराशी लाज वाटली नाही का?'
'यामुळे अशा लोकांवर कायदेशीर वचक असला पाहिजे. कुठल्याही धर्माची विटंबना करताना.. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो हे या लोकांना माहीत असताना.. असे प्रकार करणं म्हणजे संन्यासाच्या वेषात गुंडागर्दी करण्याचा प्रकार आहे.'
'तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये महंमदाने केली प्रार्थना विखुरला इस्लाम कराया शहाणा.. संघटीत केले त्याने स्वजन.. असं हजरत पैंगबरांचं वर्णन केलं आहे. त्यामुळे मस्जिद मैं भी है खुदा, मंदिर मैं राम है.. असं म्हणणाऱ्या तुकडोजी महाराजांच्या महाराष्ट्रात असे लफंगे महाराज (रामगिरी महाराज) जन्माला येणं.. मला असं वाटतं की, हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे. स्वत: नाव रामगिरी ठेवताना यांना जरा जरी भान का राहिलं नाही?'
हे ही वाचा>> Kalyan Crime: लघुशंकेला गेला तिथं दिसली बॅग, उघडली तर.. कल्याणमधील घटनेने मोठी खळबळ
'दुसऱ्या धर्माचा अवमान करा असं रामायणाने सांगितलं नाही किंवा महाभारताने, बायबलने किंवा कुराणाने सांगितलं नाही.'
'अशाप्रकारे जे वक्तव्य केलं ते निंदनीय आहे. मी तर उलट म्हणेन की, अशा व्यक्तीची पाठराखण करू नये. देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली याला तात्काळ अटक करावी. जर एखाद्या धर्माबाबत बोलून दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण होत असेल तर या दंगलखोरीचं मूळ.. जसं मालेगावच्या दंगलखोरीचं मूळ होतं.. तसं या दंगलखोरीचं मूळ हा महाराज आहे का? अशा व्यक्तीवर ताबडतोब कारवाई केली पाहिजे.' अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी रामगिरी महाराज यांच्यावर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT