Dindori Lok Sabha 2024: पवारांचा गेम पवारच करणार... दिंडोरीत काय घडणार?

रोहित गोळे

Lok Sabha Elections 2024: जाणून घ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा रंजक इतिहास आणि येथील नेमके राजकीय डावपेच कसे असणार.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

Dindori Lok Sabha Election 2024: दिंडोरी: नाशिक लोकसभा मतदारसंघाला लागूनच असलेला दिंडोरी मतदारसंघ हा काहीसा दुर्लक्षित असलेला भाग.. मात्र, 2019 लोकसभेनंतर हा मतदारसंघ अचानक चर्चेत आला. ज्याची सुरुवातच उमेदवारीपासून झाली. 2014 साली ज्या भारती पवार यांना पराभूत करण्यासाठी भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावलेली त्याच भारती पवारांना भाजपमध्ये आणण्याची एक वेगळी खेळी इथं खेळली गेली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या भारती पवार यांना उमेदवारी देऊन भाजपने आपला डाव यशस्वीही करून दाखवलेला. (ganit lok sabhecha see how the political mathematics will be done in dindori constituency at the time of lok sabha elections 2024)

पण एवढ्यावरच न थांबता पहिल्याच टर्ममध्ये निवडून गेलेल्या भारती पवारांना चक्क केंद्रात राज्यमंत्री पदही देण्यात आलं. ज्यामुळेच सर्वांच्या भुवयाही उंचावललेल्या त्यामुळेच आता या मतदारसंघाकडे सगळ्यांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत...

दिंडोरी मतदारसंघाचा इतिहास

पंतप्रधान मोदी हे धक्कातंत्रासाठी खूपच प्रसिद्धए येत. मग ती कोणाची उमेदवारी असो किंवा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री ठरवणं असो.. ते कायमच सर्वांना आश्चर्यचकीत करणारा निर्णय घेतात. असाच एक निर्णय त्यांनी 7 जुलै 2021 रोजी घेतला होता. 

कोरोना काळानंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार केलेला. ज्यासाठी महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेत्यांची नावं ही चर्चेत होती. मात्र, कोणाच्याही ध्यानीमनी नसणाऱ्या नावाला मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिलेलं. हेच नाव म्हणजे भारती पवार. 

    follow whatsapp