Video : क्रॉस वोटींगच्या प्रश्नावर जितेश अंतापूरकरांनी काढला पळ, नांदेडमध्ये काय घडलं?

मुंबई तक

Jitesh Antapurkar Video : नांदेडमध्ये आज पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. ही बैठक आटोपल्यानंतर सभागृहाबाहेर माध्यमांची प्रतिनिधी दिसताच अंतापूरकर यांनी आपल्या वाहनाच्या दिशेने पळ काढला होता.

ADVERTISEMENT

google news

Jitesh Antapurkar Video : कुवरचंद मंडले, नांदेड : विधानसभा निवडणुकीत क्रॉसवोटींग केल्याचा आरोप असलेले आमदार जितेश अंतापूरकर पत्रकारांना पाहून पळ काढल्याची घटना घडली आहे. शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर सभागृहाबाहेर माध्यमांची प्रतिनिधी दिसताच त्यांनी आपल्या वाहनाच्या दिशेने पळ काढला. 

 नांदेडमध्ये आज पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. ही बैठक आटोपल्यानंतर सभागृहाबाहेर माध्यमांची प्रतिनिधी दिसताच अंतापूरकर यांनी आपल्या वाहनाच्या दिशेने पळ काढला होता. मात्र तरीही माध्यम प्रतिनिधींनी त्यांना अखेर गाठलेच. यावेळी मी काँग्रेसमध्येच असून चर्चा काय व्हायच्या ते होवू द्या. यावर योग्यवेळी सविस्तर बोलणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
 
 आरोप हे होतच असतात. माझ्यावरती झालेल्या आरोपावर मी सविस्तर बोलणार आहे. क्रॉस व्होटींगच्या आरोपावर मी पुराव्यानिशी बोलणार असल्याचे देखील अंतापूरकर यांनी सांगितले.