प्रविण दरेकर यांची रामदास कदमांवर जोरदार टीका
प्रविण दरेकर यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की कदमांनी आपल्या वकत्व्याला बालिशपणाचे म्हटले.
ADVERTISEMENT
प्रविण दरेकर यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की कदमांनी आपल्या वकत्व्याला बालिशपणाचे म्हटले.
भाजप नेते प्रविण दरेकर यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री असल्याचे सांगून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना भाजपकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपचे संयमाला दुबळेपणा समजू नका, असा इशारा भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय नेत्यांपैकी एक असेलले दरेकर यांनी दिला आहे. मुंबई तक सोबत संवाद साधताना दरेकर यांनी कदम यांना खडे बोल सुनावले आहेत आणि त्यांच्या वकत्व्याला बालिशपणाचे म्हटले आहे. रामदास कदम हे महायुतीमधील ज्येष्ठ नेते आहेत पण त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ती चार भिंतीच्या आत मांडायला पाहिजे होती असे देखील ते म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT