Uddhav Thackeray speech : "आतमध्ये राहून दगाबाजी करू नका", ठाकरे कडाडले

मुंबई तक

Uddhav Thackeray News : शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी कुंपणावरील नेत्यांना स्पष्ट मेसेज दिला. त्यांच्या या भाषणाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray News : शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी कुंपणावरील नेत्यांना स्पष्ट मेसेज दिला. त्यांच्या या भाषणाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

social share
google news

Uddhav Thackeray Latest News : शिवसेनेच्या (UBT) मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या मेळावा बुधवारी (31 जुलै) पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी कुंपणावर असलेल्या पक्षातील नेत्यांना स्पष्ट मेसेज दिला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही नेतेही 'जय महाराष्ट्र' करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी नेत्यांना खडेबोल सुनावले. (Shiv Sena UBT Leader Uddhav Thackeray Message to party leaders)

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक विभागात पक्ष बांधणीचे काम उद्धव ठाकरेंनी सुरू केल्याचे दिसत आहे. अशात मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यात मेळाव्यातून ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

    follow whatsapp