Opinion Poll : देवेंद्र फडणवीसांना बसणार जबर झटका? 'त्या' सर्व्हेत काय?
Opinion Poll : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला झटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? विदर्भात कोणती युती आघाडीवर असणार आहे? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
Opinion Poll : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला झटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? विदर्भात कोणती युती आघाडीवर असणार आहे? हे जाणून घेऊयात.
Sakal Media Opinion Poll : लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी सर्वच पक्षानी तयारी सुरु आहे.महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी आणि जागावाटपासाठी बैठकांचा धडाका लावला जात आहे. त्यात आता एक सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेत आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) महायुतीला झटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? विदर्भात कोणती युती आघाडीवर असणार आहे? हे जाणून घेऊयात. (Vidhan sabha election 2024 devendra fadnavis big blow on vidarbha mahayuti vs maha vikas aghadi sakal media survey opinion poll)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
विधानसभा निवडणुकीआधी सकाळ मिडीयाने एक ओपिनियन पोल केला होता. या ओपनियन पोलनूसार विधानसभा निवडणुकीत महायुतीला 136 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 152 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या सर्व्हेतील अंदाजानूसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा अंदाज आहे.
हे ही वाचा : Ladka Bhau Yojana: तुम्हाला माहितीए 'माझा लाडका भाऊ' योजनेचं खरं नाव काय?
दरम्यान हा झाला महाराष्ट्रापुरता अंदाज आहे. आता विधानसभा निवडणुकीत विदर्भात कोणत्या आघाडीला यश येणार? आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? हे जाणून घेऊयात. सर्व्हेनुसार विदर्भात महाविकास आघाडीचंच पारड जड दिसताना दिसतंय. विदर्भात महाविकास आघाडीला 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महायुतीला 29 जागा मिळण्याची शक्यता आहे.
पक्षनिहाय सर्व्हेचा अंदाज पाहिल्यास काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष ठरणार आहे. कारण काँग्रेसला 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 आणि शिवसेना ठाकरे गटाला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Pooja Khedkar: मोठी बातमी, IAS पूजा खेडकरांच्या आईला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
विदर्भात भाजपला मोठा धक्का बसण्याचा अंदाज आहे. कारण भाजपला विदर्भात 24 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अन्य पक्षाला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व्हेनुसार महाविकास आघाडी विदर्भात बाजी मारण्याची शक्यता आहे. विदर्भात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांची ताकद अपूरी पडण्याचा अंदाज दिसतोय. आता हेच आकडे खरे ठरतात का? हे आता निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT