Pooja Khedkar: मोठी बातमी, IAS पूजा खेडकरांच्या आईला अटक, पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई तक

IAS Pooja Khedkar Mother arrested: IAS पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना एका शेतकऱ्याला धमकवल्या प्रकरणी अखेर आज रायगडमधून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा एका व्हिडीओ समोर आला होता. ज्यानंतर आता त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याती आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पूजा खेडकर यांच्या आईला अटक

point

मनोरमा खेडकर यांच्या आईला रायगडमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात

point

बंदूक दाखवून धमकवल्या प्रकरणी मनोरमा खेडकरांवर अटकेची कारवाई

IAS Pooja Khedkar Mother Manorama Khedkar arrested: (ओंकार वाबळे, पुणे): वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना आज (18 जुलै) सकाळी रायगडमधून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये त्या बंदूक हातात घेऊन एका शेतकऱ्याला जमिनीबाबत धमकावत असल्याचं समोर आलं होतं. (police take big action against ias pooja khedkar mother manorama Khedkar arrested in the case of threatening a farmer)

आता हेच प्रकरण मनोरमा खेडकर यांना भोवलं असून पौड पोलिसांच्या पथकाने आज सकाळी रायगड जिल्ह्यातील महाड येथून अटक केली. 

'ही' गोष्ट मनोरम खेडकरांना भोवली!

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पंढरीनाथ पासलकर यांनी फिर्याद दिल्यानंतर पुणे जिल्ह्यातील पौड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पूजा खेडकर यांच्या IAS भरतीबाबत सवाल उपस्थित होत असतानाच त्यांची आई मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत मनोरमा खेडकर या एका शेतात जात एका शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून धमकावत असल्याचं पाहायला मिळालं होतं.

मनोरमा खेडकर यांच्यावर गंभीर आरोप

मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध 12 जुलै 2024 रोजी या प्रकरणी तक्रार देण्यात आली होती. तक्रारदार पासलकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेलं की, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील धडवली येथे सर्व्हे क्रमांक 12/1 आणि 15/1 मध्ये सामाईक जमीन आहे. 2006 मध्ये मनोरमा दिलीप खेडकर यांनी धडवलीमध्ये सर्व्हे क्रमांक 12/1 आणि 15/1 मधील काही जमीन खरेदी केली. पूजा खेडकर यांच्या वतीने मनोरमा खेडकर यांनी ही जमीन खरेदी केली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp