आईचे 50 वर्षीय पुरुषासोबत संबंध, मुलगी एकटी असताना अचानक घरात घुसला अन्... शेवटी, असह्य तरुणीचं भयानक कृत्य!
एका 19 वर्षीय तरुणीने भयंकर कृत्य केल्याचं वृत्त आहे. 1 जानेवारी रोजी पीडिता घरी असताना एक शेजारी राहणारा 50 वर्षीय पुरूष दारूच्या नशेत तिच्या घरात घुसला आणि तरुणीला पाहताच त्याची नियत फिरली. त्याने तिच्यासोबत घृणास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न केला. अखेर, तरुणीने असह्य होऊन भयंकर कृत्य केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आईचे 50 वर्षीय पुरुषासोबत संबंध
मुलगी एकटी असताना अचानक घरात घुसला अन्...
शेवटी, असह्य तरुणीचं भयानक कृत्य!
Crime News: उत्तर प्रदेशातील बांदाच्या मुरवल गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 19 वर्षीय तरुणीने भयंकर कृत्य केल्याचं वृत्त आहे. 1 जानेवारी रोजी पीडिता घरी असताना एक शेजारी राहणारा 50 वर्षीय पुरूष दारूच्या नशेत तिच्या घरात घुसला आणि तरुणीला पाहताच त्याची नियत फिरली. त्याने तिच्यासोबत घृणास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, पीडितेने त्याला विरोध केला. मात्र, तो शेजारी थांबण्याचं नाव घेत नव्हता. शेवटी, तरुणीला नाईलाजाने त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करावा लागला. यामध्ये, संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
आईचा प्रियकर सतत घरी यायचा अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पुरूष मुलीच्या घरी वारंवार यायचा. खरं तर, त्याचे पीडितेच्या आईसोबत संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. तिच्या वडिलांचं आधीच निधन झालं होतं. संबंधित तरुणाला आईच्या प्रियकराचं घरी येणं अजिबात आवडत नव्हतं. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तो तिच्या घरी आला तेव्हा तरुणीला पाहून त्याची नियत फिरली. दारूच्या नशेत असताना त्याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी गूड न्यूज! 2026 मध्ये तीन नव्या मेट्रो मार्गिकांची निर्मिती... किती स्थानकांचा समावेश?
दारूच्या नशेत विनयभंगाचा प्रयत्न अन् कुऱ्हाडीने हत्या..
दरम्यान, पीडितेने त्याच्या कृत्याला विरोध केला आणि तीव्र निषेध केला. पण वासनांध पुरूष तिच्यावर जबरदस्ती करत राहिला. पुरुषाचं वागणं मर्यादेपलिकडे गेल्यानंतर, तरुणीने नाईलाजाने भयानक कृत्य केलं. तिने तिच्याजवळ असलेली धारदार कुऱ्हाड उचलली आणि त्या पुरूषावर वार करू लागली. या जीवघेण्या हल्ल्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. यामध्ये, त्याचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा: "तो युट्यूबर माझ्या पत्नीसोबत शहराबाहेर जातो अन्..." पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोलिसांसमोर घातला गोंधळ!
पोलिसांच्या माहितीनुसार, 1 जानेवारी रोजी संबंधित तरुणीने त्याच्या शेजारी राहणाऱ्या 50 वर्षीय तरुणाची हत्या केली. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी तरुणीला अटक केली असून या प्रकरणात पुढील कारवाई केली जाणार आहे.










