विधान परिषद निवडणुकीमुळे भाजप सावध! राष्ट्रवादीच्या आमदारांना उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन
विधान परिषद निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात असल्यानं मत फुटीची भीती राजकीय पक्षाना सतावू लागली आहे. त्यामुळे भाजपबरोबर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षानी आमदारांबद्दल खबरदारी घेण्यास सुरूवाती केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमदारांची हॉटेलवारी होणार आहे. राष्ट्रवादी-शिवसेनेनं आमदारांना मुंबईत बोलावलं आहे. राज्यात विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजपकडून […]
ADVERTISEMENT

विधान परिषद निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात असल्यानं मत फुटीची भीती राजकीय पक्षाना सतावू लागली आहे. त्यामुळे भाजपबरोबर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षानी आमदारांबद्दल खबरदारी घेण्यास सुरूवाती केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमदारांची हॉटेलवारी होणार आहे. राष्ट्रवादी-शिवसेनेनं आमदारांना मुंबईत बोलावलं आहे.
राज्यात विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजपकडून ५ जण, तर महाविकास आघाडीकडून ६ जण निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सहावी जागा जिंकणार की, भाजप राज्यसभेप्रमाणेच आघाडीला मात ५वी जागा मिळवणार यांचीच चर्चा सध्या होतेय.
भाजप आणि काँग्रेसला जास्तीचा एक उमेदवार निवडून आणण्यासाठी बाहेरच्या मतं लागणार आहे. विधान परिषदेला गुप्त मतदान असल्यानं मत फुटीचीही भीती राजकीय पक्षांना आहे. त्यामुळे मतफुटी टाळण्यासाठी आणि अधिकची मते मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न होताना दिसत आहे.
विधान परिषद निवडणूक : काँग्रेसकडून नाराज अपक्षांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू