शिवसेना ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांची रणनीती ठरली? काय आहे मिशन १८८?

वाचा सविस्तर बातमी एकनाथ शिंदे यांची पुढची रणनीती काय असेल?
what is Eknath Shinde's strategy to take over Shiv Sena? What is Mission 188?
what is Eknath Shinde's strategy to take over Shiv Sena? What is Mission 188?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता उद्धव ठाकरेंकडून शिवसेना ताब्यात घेण्यासाठी चंगच बांधला आहे असं दिसतं आहे. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून एकनाथ शिंदे यांनी आमदारांना आपल्या साथीला घेत बंड पुकारलं. आम्ही शिवसेनेतच आहोत आणि बंड केलेलं नाही तर उठाव केला आहे असं एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी म्हटलंय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेना वाचवण्यासाठी त्यांच्या पातळीवर संघर्ष करत आहेत.

what is Eknath Shinde's strategy to take over Shiv Sena? What is Mission 188?
शिवसेनेत उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे गट, शिवसैनिक संभ्रमात

या सगळ्या घडामोडी घडत असताना जर मागच्या एक महिन्यातलं निरीक्षण अभ्यासलं तर हे लक्षात येतं आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं बळ आणि ताकद वाढते आहे. शिवसेनेतल्या १२ खासदारांनीही शिंदे गटाला पसंती देत एक पत्र लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलं. तसंच त्याआधीच ठाणे, नवी मुंबई आणि नवी मुंबईतले माजी नगरसेवकही एकनाथ शिंदेच्या गटात सहभागी झाले आहेत.

मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे कळतं आहे की एकनाथ शिंदे संपूर्ण पक्षच उद्धव ठाकरेंच्या हातून काढून घेतील. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातातून निसटणार का? या प्रश्नाचं उत्तर अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र एकनाथ शिंदे जी रणनीती आखत आहेत ती रणनीती त्याच दृष्टीने आहे हेदेखील विसरता येणार नाही.

what is Eknath Shinde's strategy to take over Shiv Sena? What is Mission 188?
Eknath Shinde : "अन्यायाविरोधात पेटून उठा या बाळासाहेबांच्या विचारांवर आमची वाटचाल"

एकनाथ शिंदे यांचं मिशन १८८ काय आहे?

आत्ता पर्यंत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे असा दावा सातत्याने करत आहेत की आमदार फुटून गेले, खासदार फुटले तरीही शिवसेना फुटलेली नाही. मात्र एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेची कार्यकारिणी तसंच प्रतिनिधी सभा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पावलं टाकत आहेत असं समजतं आहे. तसं घडलं तर मात्र उद्धव ठाकरेंच्या हातून ही संघटना निसटू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांचं लक्ष्य आता प्रतिनिधी सभेवर आहे. या प्रतिनिधी सभेत २८२ सदस्य आहेत त्यापैकी दोन तृतीयांश सदस्य म्हणजेच १८८ सदस्य आमच्यासोबत आहेत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे असं कळतंय. एकनाथ शिंदे यांचं मिशन १८८ हेच आहे अशीही चर्चा आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या बंगल्यावर सदस्यांची नव्याने नोंदणी सुरू आहे. तसंच शिंदे गटाने राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये पथकं पाठवली आहेत. या पथकांच्या माध्यमातून कोणाकोणाला शिंदे गटात यायचं आहे याची चाचपणी केली जाणार आहे. जिल्हा प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य तसंच नगरसेवक या सगळ्यांचीच नोंदणी सुरू आहे ही माहितीही सूत्रांनी दिली आहे.

यात महत्त्वाची बाब ही की एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होऊ इच्छिणारे जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य तसंच नगरसेवक यांच्यापैकी अनेकजण हे शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेचा भाग आहेत. आता शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेचा भाग असलेले नेते जर शिंदे गटात आले तर नक्कीच त्याचा परिणाम शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेवर होईल.

शिवसेनेतली ही प्रतिनिधी सभा ताब्यात आली तर एकनाथ शिंदे गटाचं बळ वाढू शकतं. तसंच एकनाथ शिंदे यांनी जर ही सभा ताब्यात घेतली तर ही मोठी घडामोड ठरेल यात काहीही शंका नाही. कारण प्रतिनिधी सभा काबीज करून नंतर कार्यकारिणीवरही वर्चस्व मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे सातत्याने प्रयत्न करत आहेत.

पक्षांतर बंदी कायदा काय सांगतो?

पक्षांतर बंदी कायद्यानुसार आमदार तसंच खासदार फुटले म्हणजे पक्ष फुटला असं होत नाही. त्यासाठी संघटनेत फूट पडणं आवश्यक असतं. त्यामुळेच जर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेतले १८८ सदस्य हे आपल्या बाजूने वळवले तर त्यांना पक्ष ताब्यात घेता येईल.

शिवसेनेच्या घटनेत शिवसेना प्रमुख ते शाखाप्रमुख अशी १३ पदं आहेत. आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख तसंच मुंबईतील विभाग प्रमुख यांची मिळून प्रतिनिधी सभा आहे. त्यात २८२ सदस्य आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in