
Nilesh Rane used abusive words to Sanjay Raut and Uddhav Thackeray: मुंबई: शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल (16 जानेवारी) पत्रकारांशी बोलताना भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अपशब्द वापरले होते. ज्यानंतर त्यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) चांगलेच खवळले आहेत. त्यांनी देखील तशाच स्वरुपाचे अपशब्द वापरत संजय राऊतांवर पलटवार केला आहे. यावेळी निलेश राणेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबतही (Uddhav Thackeray) अपशब्द वापरले आहेत. (while criticizing sanjay raut nilesh rane also left the level used abusive words)
ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत निलेश राणेंनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. पण यावेळी त्यांची देखील जीभ घसरली. पाहा निलेश राणे नेमकं काय म्हणाले.
'त्या भिXXXX संजय राऊत याने जी भाषा वापरली, आता त्या भाषेमध्येच उत्तर देणार. फक्त उत्तर न देता.. संज्या तू जिथे भेटशील तिथेच तुला फटके टाकणार,एवढं नक्की... आणि त्या चुXX उद्धव ठाकरेला पण सांग तुझ्या नादाला लागणार.. तर अर्धा तर संपलाय, बाकीचा उरलासुरला संपायला वेळ लागणार नाही.' अशा शिवराळ भाषेत निलेश राणेंनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
काल (16 जानेवारी) संजय राऊत हे माध्यमांशी बोलत असताना त्यांना जेव्हा नारायण राणेंबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्यांनी राणेंबाबत अपशब्द वापरले.
पत्रकार: काल नारायण राणे भांडुपमध्ये होते. त्यांनी तुमच्यावर आरोप केले...
संजय राऊत: सोड रे चुXX तो..
असे संजय राऊत म्हणाले होते. यामुळेच आता निलेश राणे हे देखील चांगलेच खवळले आहेत.
काही दिवसांपूर्वी सामनामधील अग्रलेखात नारायण राणेंवर बोचरी टीका करण्यात आली होती. त्यावरुन नारायण राणेंनी संजय राऊतांना टार्गेट करताना म्हटलेलं की, राऊतांना पुन्हा तुरुंगात जाण्याचा मार्ग मोकळा करतोय. यानंतर राऊत देखील संतापले होते आणि त्यांनी त्यांच्या स्टाइलमध्ये राणें उत्तर दिलं होतं.
'अरे पादरा पावटा रे तो.. बाळासाहेबाच्या भाषेत.. पादरा आहे तो आतापर्यंत मी त्याच्याविषयी काही बोललो नाही. सगळ्यांना अरे-तुरे करतो. हा कोण आहे? मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे... कालपर्यंत एकनाथ शिंदेंना अरे-तुरे करत होता. जुने काढा व्हिडीओ... मोदींना अरे-तुरे.. हे कोण आहेत. याची चौकशी करा. आता मी करणार..'
'अजित पवारांनी फार समर्पक उपमा दिली आहे. यांची बुद्धी तेवढीच आहे टिल्ली. हा प्रश्न टिल्ल्या शरीरयष्टीचा नसून टिल्ल्या बुद्धीचा आहे. मी अशाप्रकारची भाषा कधी वापरत नाही. पण आता वापरलीए. याला जबाबदार सर्वस्वी नारायण राणे हा माणूस आहे. यापुढे जर तो बोलत राहिला तर मी त्याला पूर्ण नागडा करेन. ये... तुझी पोरं येतायेत तर पोरांना येऊ दे.. तू येतोस तर तू ये. ये मैदानात. साला केंद्र सरकारची सुरक्षा घेऊन फिरतोय. हिंमत आहे तर फिर ना एकटा.. मोठा भाई समजतो स्वत:ला.. चल.' असं म्हणत राऊतांनी संताप व्यक्त केला होता
दरम्यान राऊतांनी ही टीका केल्यावर राणे देखील शांत बसले नाही. त्यांनी देखील राऊतांना लागलीच प्रत्युत्तर दिलं.
'एक गोष्ट तुम्हाला सांगतो.. एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार.. कशासाठी माहितीए ना.. मी खासदार झाल्यावर संजय राऊत राज्यसभेत माझ्या बाजूला येऊन बसायचा आणि उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरेबद्दल जे काही सांगायचा ना. ते मी उद्धव ठाकरेला आता भेटून सांगणार. चपलेने नाय मारला ना उद्धव आणि रश्मीने तर मला विचारा..'
'हा शिवसेना वाढवणारा नाही तर संपवणारा आहे. हा मातोश्रीला सुरुंग लावणारा आहे. तो ज्याच्या अंगावर हात टाकेल.. खांद्यावर.. तो खांदा गळलाच समजा. असा हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे मला परत संजय राऊतबद्दल विचारु नका.' अशी जोरदार टीका नारायण राणेंनी केली होती.