पत्नीशी वाद झाला, रागच्या भरात नवऱ्याने पोटच्या मुलाला कोयत्याने वार करुन संपवलं, मृतदेह लोखंडी पेटीत लपवला

मुंबई तक

Crime News : अधिकची माहिती अशी की, आरोपीचे नाव राजेश असून तो जिजोली गावचा रहिवासी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राजेश आणि त्याची पत्नी उर्मिला यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून मालमत्तेच्या वादावरून सतत वाद होत होते. उर्मिला ही एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. राजेशला नशेचे व्यसन असल्याचेही पोलिस तपासात समोर आले असून, याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असल्याचे सांगितले जात आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीशी वाद झाला

point

रागच्या भरात नवऱ्याने पोटच्या मुलाला कोयत्याने वार करुन संपवलं

point

मृतदेह लोखंडी पेटीत लपवला

Crime News Marathi : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, एका निर्दयी वडिलाने आपल्या 12 वर्षांच्या मुलाची कोयत्याने वार हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह लोखंडी पेटीत लपवून ठेवत गावातून पलायन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मक्खनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिजोली गावात ही घटना घडली. 

अधिकची माहिती अशी की, आरोपीचे नाव राजेश असून तो जिजोली गावचा रहिवासी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राजेश आणि त्याची पत्नी उर्मिला यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून मालमत्तेच्या वादावरून सतत वाद होत होते. उर्मिला ही एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. राजेशला नशेचे व्यसन असल्याचेही पोलिस तपासात समोर आले असून, याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असल्याचे सांगितले जात आहे.

सोमवारी सकाळी घरातील वातावरण नेहमीप्रमाणेच होते. उर्मिला रोजच्या दिनक्रमानुसार शाळेत गेली. त्या वेळी घरात राजेश आणि त्यांचा 12 वर्षांचा मुलगा मयंक हे दोघेच होते. मात्र दुपारी शाळेतून घरी परतल्यानंतर उर्मिलाला घरातील परिस्थिती संशयास्पद वाटली. घरात राजेश दिसत नव्हता आणि आत रक्ताचे डाग आढळून आले. त्यामुळे उर्मिलाची घालमेल उडाली आणि तिने आपल्या मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली.

शोधादरम्यान घरातील एका लोखंडी पेटीत मुलाचा मृतदेह कोंबून ठेवलेला आढळून आला. ग्रामीण पोलीस अधीक्षक अनुज चौधरी यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, मुलाचा मृतदेह पेटीत लपवून ठेवण्यात आला होता. हा प्रकार पाहताच उर्मिलाने आक्रोश केला. तिच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला. शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp