आशीषशी लग्न अन् संजयसोबत अफेअर, अंजलीच निघाली पतीच्या हत्येची मास्टरमाईंड
Crime News : पोलीस अधीक्षक डॉ. अमृता दुहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एफएसएल पथकाच्या तपासासह तांत्रिक पुरावे गोळा केल्यानंतर संशय अधिक बळावला. कॉल डिटेल रेकॉर्ड, मोबाईल लोकेशन आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता स्पष्ट झाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलून कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आशीषशी लग्न अन् संजयसोबत अफेअर
अंजलीच निघाली पतीच्या हत्येची मास्टरमाईंड
Crime News : राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील एका कथित रस्ता अपघातामागे थरारक हत्या कट असल्याचं उघडकीस आलं असून, या प्रकरणाची मास्टरमाईंड मृतकाची पत्नीचं असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. सुरुवातीला अपघात म्हणून नोंदवलेला हा प्रकार तीन दिवसांच्या तपासानंतर सुनियोजित खुनात रूपांतरित झाला, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
रावला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 31 जानेवारी 2026 रोजी हा प्रकार घडला. वजीरचंद नावाच्या व्यक्तीने आपल्या पुतण्या आशीष याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवत प्राथमिक तपास सुरू केला. मृतदेहावर झालेल्या जखमा अपघातात होणाऱ्या जखमांशी सुसंगत नसल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
पोलीस अधीक्षक डॉ. अमृता दुहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एफएसएल पथकाच्या तपासासह तांत्रिक पुरावे गोळा केल्यानंतर संशय अधिक बळावला. कॉल डिटेल रेकॉर्ड, मोबाईल लोकेशन आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता स्पष्ट झाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलून कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले.
हेही वाचा : "जिल्हाधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे जव्हारच्या 200 बेड रुग्णालयाचा निधी HUDCO कडे परत जाण्याची नामुष्की!"










