Kasba : बापटांना घाम फोडला, रासनेंशी दोन हात, कोण आहेत रवींद्र धंगेकर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Kasba Peth Assembly By election results : राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. इथून काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. तर भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांना पराभावाचा सामना करावा लागला आहे. रवींद्र धंगेकर यांनी तब्बल ११ हजार ०४० मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. (Who is congress wining candidate ravindra dhangekar from kasba peth assembly bypoll)

कसब्यात भाजपने ब्राह्मण उमेदवार न दिल्याने पेठांमधील मतदार नाराज असल्याचं दिसून आलं होतं. अशातच धंगेकर यांच्या रुपाने काँग्रेसने तगडा उमेदवार मैदानात उतरवल्याने भाजपसमोर मोठं आव्हान उभं राहिल्याची चर्चा होती. त्यामुळे पोटनिवडणुकीतील विविध सर्व्हे आणि राजकीय पंडितांनी धंगेकर यांच्या विजयाचं भाकीत वर्तवलं होतं. अखेर धंगेकर यांनी भाजपला अक्षरशः घाम फोडतं विजय मिळविला आहे.

Kasba Peth By Election Results: धंगेकरांनी घडवला इतिहास! भाजपने बालेकिल्ला गमावला

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पण कसब्याच्या लढतीत चुरस वाढवणारे आणि जिंकणारे रवींद्र धंगेकर कोण आहेत :

रवींद्र धंगेकर यांचा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी धंगेकरांची ओळख राहिली आहे. मनसेमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केलं. इथंच त्यांची राजकीय कारकीर्द फुलली. ४ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. याकाळात त्यांनी कसब्यामध्ये बरीचं विकासकामं केली.

ADVERTISEMENT

याच विकासकामांच्या जोरावर त्यांनी मनसेकडून २००९ ची विधानसभा निवडणूक लढली. यात त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार आणि तत्कालिन उमेदवार गिरीश बापट यांना तगडं आव्हान दिलं. मातब्बर बापट नवख्या धंगेकरांकडून अवघ्या ७ हजार मतांनी विजयी झाले होते. यातूनच खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.

ADVERTISEMENT

Kasba Peth Bypoll Results 2023 : कसब्यात भाजपला झटका, धंगेकरांनी उधळला गुलाल!

२०१४ मध्येही कसबा पेठेतून धंगेकरांनी निवडणूक लढवली. पण तेव्हा त्यांचा पराभव झाला. पुढे जानेवारी २०१७ मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण २०१९ मध्ये काँग्रेसनं धंगेकरांऐवजी अरविंद शिंदेंना तिकीट दिलं. धंगेकर ओबीसी समाजातून येतात. कसबा मतदारसंघात ओबीसी आणि मराठा समाजाचा मोठा टक्का आहे. अखेर आता ओबीसी समाजाील धंगेकर यांना तिकीट देऊन काँग्रेसने ही जागा आपल्याकडे खेचली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT