IND Vs PAK Asia Cup 2023: इंडिया पाकिस्तानवर करणार हल्लाबोल, आज हे विक्रम होणार…
IND Vs PAK Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 मधील पहिल्याच भारत-पाक सामन्याकडे आता साऱ्यांच लक्ष लागले आहे. कारण या सामन्याच्या निमित्ताने आता नवनवे विक्रमही होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

IND Vs PAK Asia Cup 2023: आज भारतातीलच नाही तर साऱ्या जगातील क्रिडाप्रेमींचे लक्ष भारत-पाकिस्तान सामन्याकडे लागून राहिले आहे. तसेच आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) मधील सामने भारतीय क्रिकेट संघ आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. दोन्ही संघामधील हा आजचा ब्लॉकबस्टर सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 3 वाजता होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर असणार तर बाबर आझमकडे पाकिस्तानच्या संघाची धुरा असणार आहे.
वेगवान आक्रमणाचा सामना
भारत-पाकिस्तान संघाचा सामना एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या ड्रेस रिहर्सलसारखा असणार आहे. ज्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे अनुभवी फलंदाज असणार तर हरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या जबरदस्त वेगवान आक्रमणाचा सामना करणार आहेत.
हे ही वाचा >>Saurabh Ganguly: ‘भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होईल’ परवेझ मुशर्रफ, सौरभ गांगुलीला असं का म्हणाले होते?
लोकप्रियतेची संधी
गेल्या वर्षीच्या T20 विश्वचषकावेळी हरिस रौफच्या चेंडूवर कोहलीने मारलेला शानदार फटका अजूनही भारतीय क्रिकेट चाहत्यांना आठवत असेल. तर त्याचवेळी आफ्रिदीच्या वेगवान चेंडूचा सामना करण्यात शाहीनही अपयशी ठरला होता. तर रोहित एलबीडब्ल्यू आऊट झाला होता. खेळाडूंच्या या कामगिरीमुळेच खेळाडू दिग्गज बनतात, त्यामुळे आता आशिया चषक स्पर्धेत दोन्ही महासंघाच्या स्टार खेळाडूंना देशात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचण्याची संधी मिळणार आहे.
Lights 💡
Camera 📸
Action ⏳Have a look at #TeamIndia‘s fun-filled Headshots session ahead of #AsiaCup2023 😃🔽
— BCCI (@BCCI) September 1, 2023










