पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा पराभव; भारताचे हे चौघं ठरले विजयाचे शिल्पकार

या विजयाचे 4 हिरो होते, ज्यांनी ऑस्ट्रेलियाची चारही बाजूंनी कोंडी करत विजय मिळवला. हे चार हिरो आहेत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि सलामीवीर केएल राहुल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताची 1-0 ने आघाडी.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताची 1-0 ने आघाडी. Ind vs aus oneday series

India vs Australia 1st ODI: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या होम वनडे मालिकेत विजयाने सुरुवात केली. शुक्रवारी (17 मार्च) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना झाला. हा सामना खूपच रोमांचक होता, ज्यामध्ये टीम इंडियाने 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाचे 4 हिरो होते, ज्यांनी ऑस्ट्रेलियाची चारही बाजूंनी कोंडी करत विजय मिळवला. हे चार हिरो आहेत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि सलामीवीर केएल राहुल. (Australia lost in first ODI; These four of India became the architect of victory)

जडेजाची अष्टपैलू कामगिरी

सर्वप्रथम, मॅन ऑफ द मॅच जडेजाबद्दल बोलूया. त्याने प्रथम गोलंदाजीत 2 बळी घेतले. यानंतर 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 83 धावांवर 5 विकेट गमावत असताना जडेजाने अप्रतिम फलंदाजी दाखवत 69 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या. जडेजाने राहुलसोबत सहाव्या विकेटसाठी 123 चेंडूत 108 धावांची नाबाद भागीदारी केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताची 1-0 ने आघाडी.
WPL 2023 : स्पॉन्सरच नाही! महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या लेकीने हातानेच लिहिले नाव...

विजयाचा दुसरा नायक केएल राहुल आहे, ज्याने सतत विकेट्स पडत असतानाही क्रीझवर पाय रोवले. त्याने आपल्या कारकिर्दीतील तेरावे अर्धशतक कठीण परिस्थितीत झळकावले आणि संघाला विजय मिळवून दिला. सलामीला आलेल्या राहुलने 91 चेंडूत 75 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला.

सिराज-शमीने गोलंदाजीत कमाल केली

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ 35.4 षटकात 188 धावांवर गारद झाला. एकेकाळी ऑस्ट्रेलियाने पहिल्या 20 षटकात 130 धावा केल्या होत्या. त्यानंतर मिचेल मार्शला तुफानी फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाला 300 धावांपर्यंत पोहोचवायचे होते. मात्र येथून शमी-सिराजने आघाडी घेतली आणि 3-3 विकेट घेत संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला 188 धावांत गुंडाळले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताची 1-0 ने आघाडी.
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत कोण मारणार बाजी; कोणाचा रेकॉर्ड आहे सरस?

शमीने सामन्यात 17 धावांत 3 बळी घेतले. तर सिराजने 29 धावा देत तितक्याच विकेट घेतल्या. शमीने जोश इंग्लिस, कॅमेरून ग्रीन आणि मार्कस स्टॉइनिस यांची शिकार केली. सिराजने सलामीवीर ट्रॅव्हिस हेड, शॉन अॅबॉट आणि अॅडम जम्पाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताची 1-0 ने आघाडी.
WPL: प्रचंड चर्चेत असलेली यास्तिका भाटिया आहे तरी कोण?

ऑस्ट्रेलियन संघाला 169 धावांवर पाचवा धक्का बसला. यानंतर उर्वरित संघ 188 धावांवर बाद झाला. म्हणजेच, कांगारू संघाने पुढील 19 धावा करताना शेवटच्या 5 विकेट गमावल्या. तसे झाले नसते आणि ऑस्ट्रेलियन संघाने 250 पेक्षा जास्त धावा केल्या असत्या तर भारतीय संघाला हा सामना जिंकणे अशक्य झाले असते.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in