IPL 2022 : घडलेला प्रकार दुर्दैवी, मैदानात जाऊन वाद घालणं अयोग्यच – शेन वॉटसन

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

शुक्रवारी आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्ध राजस्थान या सामन्यात नो-बॉलवरुन घडलेल्या प्रकाराचे पडसाद अजुनही उमटताना दिसत आहेत. पंचांनी दिलेल्या निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या कर्णधार ऋषभ पंत, प्रशिक्षक प्रवीण अमरे आणि गोलदांज शार्दुल ठाकूर यांना दंड ठोठावण्यात आला आहे.

या प्रकरणात अनेक आजी-माजी खेळाडू आपली प्रतिक्रीया देत आहेत. दिल्लीच्या संघाचा सहायक प्रशिक्षक शेन वॉटसनने घडलेल्या प्रकाराबद्दल आपल्या संघाला कानपिचक्या देत घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याचं सांगितलं.

Flashback: राजस्थानचा संघ, नो-बॉलचा ड्रामा, जेव्हा शांत डोक्याचा धोनी मैदानात अंपायरशी भिडतो

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“हे पाहा, शेवटच्या ओव्हरमध्ये जे काही घडलं ते दुर्दैवी होतं. आम्ही संपूर्ण सामन्यात शेवटपर्यंत गोष्टी सांभाळून ठेवण्यात अयशस्वी ठरलो. अखेरच्या ओव्हरदरम्यान जे काही झालं त्याचं दिल्ली कॅपिटल्स कधीच समर्थन करणार नाही. अंपायरनी दिलेला निर्णय, मग तो चूक असो किंवा मग बरोबर आम्हाला तो मान्य करायला हवा. कोणी मैदानावर जाऊन वाद घालतंय हे अयोग्य होतं आणि याचं समर्थन करता येणार नाही”, सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शेन वॉटसनने संघाची बाजू मांडली.

अखेरच्या ओव्हरमध्ये दिल्लीला विजयासाठी 36 धावांची गरज असताना राजस्थान रॉयल्सच्या ओबेड मकॉयच्या बॉलिंगवर वेस्ट इंडिजच्या रोव्हमन पॉवेलने 3 षटकार ठोकले. यावेळी मकॉयचा तिसरा बॉल हा पॉव्हेलच्या कमरेवर असल्यामुळे दिल्लीने त्याला नो-बॉल घोषित करण्याची मागणी केली. परंतू पंचांनी तो निर्णय नाकारल्यामुळे मैदानात पुढची काही मिनीटं राडा झाला.

ADVERTISEMENT

IPL 2022 : नो-बॉलवरचा राडा भोवला, मैदानात वाद घालणाऱ्या पंतचं 100 टक्के मानधन कापलं

ADVERTISEMENT

दरम्यान अंपायरच्या निर्णयाविरुद्ध मैदानात जाऊन हुज्जत घालणारे दिल्लीचे प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. तसेच रोव्हमन पॉवेलला परत बोलावणाऱ्या दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतचं 100 टक्के मानधन कापून घेण्यात आलं आहे. तसेच शार्दुल ठाकूरच्या मानधनातली 50 टक्के रक्कम कापून घेण्यात आली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT