सांगली: 9 महिन्यांचा चिमुकला पाळण्यात झोपी गेला, वादळी वारा आला अन्...
Sangli News : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या खलाटी गावात मन सुन्न करून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. अवकाळी पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पाळणा उडून गेला आणि त्यातील बाळ हवेत फेकलं गेलं, ज्यात त्या बाळाचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनं संपूर्ण जत तालुका हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नियतीचा वाईट खेळ
अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे नऊ महिन्याचा बाळाचा मृत्यू
जत तालुक्याच्या शेजुळ गाव हादरलं
Sangli News : स्वाती चिखलीकर - नियती कधी कोणासोबत कसा खेळ खेळेल याचा काही नेम नाही. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या खलाटी गावात मन सुन्न करून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. चिमुकलं बाळ पायावर उभं राहण्याआधीच नियतीनं त्याच्यावर घाला घातला. नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा वादळी वाऱ्यात झोका उडाला आणि यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनं बाळाच्या आई बापाचं नियतीने सर्वस्व हिरावून घेतलं होतं आणि पूर्ण गाव हळहळलं, या घटनेनं शेजुळ गाव हादरून गेलं आहे.
हे ही वाचा : नागपूरमध्ये गुलाबजाम मागितल्याने तरुणाने मित्राला चाकूने भोसकलं
9 महिन्यांचं बाळ पाळण्यात झोपलं आणि अक्रित घडलं
घडलेल्या घटनेनुसार, सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील खलाटी गावातील शेजुळ वस्तीत आनंदा शेजुळ यांचं कुटुंब देखील राहत होतं. घरामध्ये अवघ्या 9 महिन्यांचं बाळ पाळण्यात झोपलं होतं. आई वडील कामात व्यस्त होते, याचदरम्यान अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने हजेरी लावली होती. ज्यात नऊ महिन्यांच्या बाळाचा झोका उडून गेला आणि अक्रित घडलं.
हे ही वाचा : रुग्णालयात बाईकने एन्ट्री, 7.30 चा टायमर आणि आरोपीचा सीसीटीव्ही; पुण्यात बॉम्ब कोणी ठेवला?
वाऱ्याच्या येणाऱ्या वेगामुळे पाळणा उडाला आणि झोपलेलं बाळ हवेत फेकलं
वाऱ्याच्या येणाऱ्या वेगाने घरावरील काही पत्रे उडून गेले होते. पण दुर्दैवीपणे असं घडलं की, वाऱ्याच्या येणाऱ्या वेगामुळे पाळणा उडाला आणि त्यात झोपलेले बाळ हवेत फेकलं गेलं, ज्यात ते बाळ गंभीर जखमी झालं. वाऱ्याच्या या वेगामुळे पाळणा घरापासून दूर जाऊन फेकला गेला आणि नंतर त्याचा अंत झाला. काळजाचा तुकडा नियतीने हिरावून नेल्याने शेजुळ कुटुंबासह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.









