मुंबईची खबर : CNG महागला! नवे दर काय? मुंबईकरांवर काय परिणाम होणार?

मुंबई तक

सीएनजीच्या किमतीतही वाढ झाली असून, याचा पहिला फटका मुंबईला बसला आहे. मुंबईत सीएनजीच्या दरात अचानक 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : CNG महागला!

point

नवे दर काय?

point

मुंबईकरांवर काय परिणाम होणार?

Mumbai News : महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. आता सीएनजीच्या किमतीतही वाढ झाली असून, याचा पहिला फटका मुंबईला बसला आहे. मुंबईत सीएनजीच्या दरात अचानक 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेडने 1 किलो सीएनजीची किंमत 82 रुपयांवरून आता 84 रुपये केली आहे. सीएनजीचे हे नवीन दर 14 मे पासून लागू झाले आहेत. यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) सीएनजी महागला आहे.

जागतिक तणावाचा परिणाम

महानगर गॅस लिमिटेडने (MGL) दरवाढीबाबत स्पष्ट केले आहे की, पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तणावामुळे ही वाढ करण्यात आली आहे. यामध्ये गॅस खरेदीच्या खर्चात झालेली वाढ, कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ, भारतीय रुपयाचे घसरलेले मूल्य आणि पुरवठा साखळीतील अडथळे या गोष्टी कारणीभूत आहेत. एका अहवालानुसार, या जागतिक कारणांमुळे सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ करून तो 84 रुपये करण्यात आला आहे.

हे ही वाचा : रुग्णालयात बाईकने एन्ट्री, 7.30 चा टायमर आणि आरोपीचा सीसीटीव्ही; पुण्यात बॉम्ब कोणी ठेवला?

सीएनजी महागताच भाडेवाढीची मागणी

सीएनजीचे दर वाढल्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील रिक्षा युनियनने आता भाडेवाढीची मागणी सुरू केली आहे. महानगर गॅस लिमिटेडच्या आकडेवारीनुसार, मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे 12 लाखांहून अधिक वाहने सीएनजीवर चालतात. यामध्ये सुमारे 4.70 लाख रिक्षा आणि 1.60 लाखांहून अधिक टॅक्सींचा समावेश आहे.

रिक्षा युनियननी असा दावा केला आहे की, सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाल्यामुळे त्यांच्या खर्चात प्रति किलोमीटर 1.03 रुपयांची वाढ झाली आहे, याच आधारावर त्यांनी भाडेवाढीची मागणी केली आहे. याशिवाय, मुंबई महानगर क्षेत्रात धावणाऱ्या सुमारे 5 लाख खासगी वाहनांसाठीही आता प्रवास महागणार असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

हे वाचलं का?