अकोला : 'तू माझ्या बायकोवर जादूटोणा केलास..', घरात घुसून केले सपासप वार; 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

मुंबई तक

अकोल्यात जादूटोण्याच्या संशयावरुन एका वृद्ध व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण ग्रामीण भागात खळबळ उडाली असून, सुशिक्षित समाजात अद्यापही अंधश्रद्धेची मुळे किती खोलवर रुजलेली आहेत, यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ADVERTISEMENT

Akola Crime
Akola Crime
google news

बातम्या हायलाइट

point

अकोला : तू माझ्या बायकोवर जादूटोणा केलास..

point

घरात घुसून केले सपासप वार

point

65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Akola Crime, धनंजय साबळे : महाराष्ट्र राज्यात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढले असून, अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तालुक्यातील व्याळा पेठ येथे जादूटोण्याच्या संशयावरून 65 वर्षीय हरिदास पांडुरंग वानरे यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण ग्रामीण भागात खळबळ उडाली असून, सुशिक्षित समाजात अद्यापही अंधश्रद्धेची मुळे किती खोलवर रुजलेली आहेत, यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जादूटोण्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त

या प्रकरणी मृत हरिदास यांची पत्नी रुख्मिना वानरे (60) यांनी बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आरोपी सुधाकर गाडगे हातात लाकडी दांडके घेऊन वानरे यांच्या घरी पोहोचला. त्याने सुरुवातीला शिवीगाळ करत घरात जबरदस्तीने प्रवेश केला. "तुझ्या जादूटोण्यामुळे माझ्या पत्नीचे आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे," असा अजब आरोप करत आरोपीने वादाला सुरुवात केली आणि रागाच्या भरात हरिदास यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने भीषण प्रहार केले.

हे ही वाचा : निर्दयी आई-बाप! चिमुकल्याच्या शिराचे लचके तोडत होते भटके कुत्रे, उरलेल्या धडाचा शोध सुरु

वानरे यांचा जागीच मृत्यू

हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की, गंभीर दुखापत झाल्यामुळे हरिदास वानरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 333 आणि 103(1)(3) नुसार हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्र हादरला, चुलत भावाशी अनैतिक संबंध, शिवानीची बॉडी धडापासून वेगळी; मृतदेह जाळला

पोलिसांनी काय सांगितले?

नुकत्याच सिन्नर येथील अशोक खरात यांच्याशी संबंधित भोंदूगिरीच्या प्रकरणानंतर ही दुसरी मोठी घटना समोर आल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. समाजात पसरलेली अंधश्रद्धा एका निष्पाप व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरली आहे, जे सामाजिक आरोग्यासाठी अत्यंत घातक लक्षण मानले जात आहे.
 

हे वाचलं का?