निर्दयी आई-बाप! चिमुकल्याच्या शिराचे लचके तोडत होते भटके कुत्रे, उरलेल्या धडाचा शोध सुरु
काही भटके कुत्रे एका लहान मुलाचे कापलेले शिर ओरबडताना आणि ओढून नेताना आढळले. हा अंगावर शहारे आणणारा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, या घटनेने पोलीस प्रशासनाचीही झोप उडवली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
निर्दयी आई-बाप!
चिमुकल्याच्या शिराचे लचके तोडत होते भटके कुत्रे
उरलेल्या धडाचा शोध सुरु
Crime News : तेलंगणातील कोथगुडेम जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भयावह घटना समोर आली आहे. पालोंचा मंडळातील बोलोरिगुडेम परिसरात काही भटके कुत्रे एका लहान मुलाचे कापलेले शिर ओरबडताना आणि ओढून नेताना आढळले. हा अंगावर शहारे आणणारा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, या घटनेने पोलीस प्रशासनाचीही झोप उडवली आहे. गुरुवारी (14 मे) सकाळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला कुत्र्यांची झुंड काहीतरी ओढताना दिसली, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
चिमुकल्याच्या कापलेल्या शिराचे लचके
घटनेची माहिती मिळताच प्रत्यक्षदर्शींनी जवळ जाऊन पाहिले असता, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कुत्रे एका चिमुकल्याच्या कापलेल्या शिराचे लचके तोडत होते. उपस्थित लोकांच्या सांगण्यानुसार, ते शिर पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होते आणि परिसरात दुर्गंधी पसरली होती. हे विदारक दृश्य पाहून भयभीत झालेल्या नागरिकांनी तातडीने स्थानिक पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनाही त्या बालकाचे अवशेष पाहून धक्का बसला. या निर्घृण घटनेमुळे संपूर्ण बोलोरिगुडेम परिसरात सध्या भयाण शांतता आणि संतापाचे वातावरण आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्र हादरला, चुलत भावाशी अनैतिक संबंध, शिवानीची बॉडी धडापासून वेगळी; मृतदेह जाळला
शरीराचा उर्वरित भाग कुठे?
या घटनेमुळे आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्या चिमुरड्याच्या शरीराचा उर्वरित भाग नेमका कुठे आहे? ही एखादी निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी टाकलेले शिर आहे की नरबळी सारख्या अघोरी प्रथेचा प्रकार आहे? या दिशेने पोलीस कसून तपास करत आहेत. त्याचबरोबर, निर्दयी पालकाने आपल्या पोटच्या गोळ्याला अशा अवस्थेत सोडून दिले आहे का, या कोनातूनही संशय व्यक्त केला जात आहे. या कृत्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर; मोदींच्या आवाहानानंतर 4 मोठे निर्णय
मृत चिमुकल्याची ओळख काय?
तपास पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. अद्याप त्या मृत चिमुकल्याची ओळख पटलेली नाही आणि शरीराचे इतर भागही मिळालेले नाहीत. पोलीस सध्या परिसरातील रुग्णालये आणि प्रसूती केंद्रांमधून बेपत्ता मुलांची माहिती गोळा करत आहेत. या खळबळजनक प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर असून, या कृत्यामागच्या गुन्हेगारांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.









