IND vs NZ : न्यूझीलंडला क्लिन स्वीप; तिसरी वनडे जिंकून भारत ‘अव्वल स्थानी’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

IND vs NZ 3rd ODI :

इंदौर : येथील होळकर स्टेडियमवर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने (India) न्यूझीलंडचा (New Zealand) तब्बल ९० धावांनी लोळवलं. याशिवाय ३-० अशी मालिका जिंकून न्यूझीलंडला क्लिन स्विप देत वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानही पटकावलं आहे. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉन्वेने १३६ धावांची झुंजार खेळी केली. पण शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांच्या तिखट माऱ्याने भारताला विजयी केलं. (India’s victory over New Zealand in Indore completed a clean sweep in the three-match ODI series.)

सुरुवातील टॉस जिंकत न्यूझीलंडने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला उतरलेल्या भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात करत २१२ धावांची सलमी दिली. शुभमन गिलने ११२ धावांची तर रोहितने १०१ धावांची शतकी खेळी केली. मात्र या दोघांच्या विकेट्स पडल्यानंतर भारताचा डाव गडगडला. विराट कोहली, इशान किशन, सुर्यकुमार यादव हे मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

IND vs NZ ODI : न्यूझीलंडचेही दमदार प्रत्युत्तर; अखेरच्या षटकात भारताचा विजय

अखेर हार्दिक पांड्याने ५४ धावांची आक्रमक खेळी करत भारताला ३५० च्या पार पोहचवले. तर शार्दूल ठाकूरने फटकेबाजी करत भारताला ३८५ धावांपर्यंत पोहचवलं. प्रत्युत्तर दाखल मैदानात उतरलेल्या किवींना दुसऱ्याच षटकात हार्दिक पांड्याने पहिला धक्का दिला. मात्र डेवॉन कॉन्वे आणि हेन्री निकोल्स यांनी किवींचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी १०६ धावांची शतकी भागीदारी रचली. मात्र निकोल्सला बाद करत कुलदीप यादवने ही जोडी फोडली.

ADVERTISEMENT

एका बाजूला डॅरेल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स यांच्या विकेट्स पडत असताना सलामीवीर डेवॉन कॉन्वे मात्र एकाकी झुंज देत होता. मात्र अखेर उमरान मलिकने कॉन्वेचा अडसर दूर करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. कॉन्वेने १०० चेंडूत १३८ धावांची तुफानी खेळी केली. अखेरीस ४२ व्या ओव्हरमध्ये ब्रेसवेलची विकेट घेत भारताने किवींना २९५ धावांत गुंडाळत व्हाईट वॉश दिला. दरम्यान, तिसऱ्या सामन्यातील विजयानंतर भारत वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहचला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT